Rashid Khan After Win vs Australia: अफगाणिस्तान संघाने सेंट व्हिन्सेंटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. सामना सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तानसारखा संघ टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करू शकेल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता, पण प्रत्यक्षात हे घडले आहे. राशिद खानच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाचा २१ धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयी कामगिरीनंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान खूप खूश दिसत होता. याचदरम्यान त्याने एक मोठं विधान केलं आहे, ज्यावरून राशिद खान या ऐतिहासिक विजयानंतरही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयानंतर राशिद खान म्हणाला की, “एक संघ आणि एक राष्ट्र म्हणून आमच्यासाठी हा मोठा विजय आहे. खूप छान वाटतंय. ही अशी गोष्ट आहे, जी गेली दोन वर्षे साध्य करण्यात आम्ही अपयशी ठरत होतो. या विजयाचा खरोखर आनंद आणि अभिमान आहे.”

“आम्ही आमच्या विरोधी संघांची गोलंदाजी करण्याची पद्धत समजून घेत आहोत आणि त्यानुसार आमचे अंतिम प्लेइंग ११ निवडत आहोत. या विकेटवर १४० ही धावसंख्या चांगली होती”, असेही तो म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवूनही खान निराश

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवूनही खान निराश असल्याची चर्चा होत आहे, कारण तशाच प्रकारचे एक विधान त्याने केले. तो म्हणाला की, “आम्ही जशी चांगली कामगिरी करायला हवी होती तशी कामगिरी केलेली नाही. सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली, पण शेवटी आम्हाला पाहिजे तशी चांगली कामगिरी करता आली नाही.”

“हेच या संघाचे सौंदर्य”

राशिद खान पुढे म्हणाला की, “या विकेटवर १३० पेक्षा जास्त स्कोअर ठीकठाक होता. आम्ही मैदानावर शांत राहिल्याने यशस्वी ठरलो. संघात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत, हेच या संघाचे सौंदर्य आहे.”

गुलबदिनचे केले तोंडभरून कौतुक

त्याने गुलबदिनचे कौतुक करत पुढे म्हटले की, :आज त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती प्रशंसनीय आहे. त्याच्याकडे जो खेळण्याचा अनुभव आहे तो आजच्या सामन्यात दिसून आला. नबीने ज्या प्रकारे सुरुवात केली, विशेषतः डेव्हिड वॉर्नरची विकेट, ते पाहून आनंद झाला”.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashid khan big statement after afghanistan beat australia by 21 runs in t20 world cup 2024 super 8 rahmanullah gurbaz gulbadin naib sjr
Show comments