Rashid Khan Emotional Post SA vs AFG: टी २० विश्वचषकात बलाढ्य संघांना हरवून उपांत्य फेरी गाठलेल्या अफगाणिस्तानच्या संघाची सध्या जगभरात चर्चा आहे. आज दक्षिण आफ्रिकेने अगदी लाजिरवाण्या धावसंख्येवर अफगाणिस्तानला रोखून उपांत्य फेरीतूनच माघारी पाठवलं असलं तरी इथवर पोहोचण्याचा प्रवास पाहता अनेक स्तरातून रशीद खानच्या संघाचं कौतुक होत आहे. स्वतः क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने सुद्धा सुपर आठ मधील सामन्यानंतर अफगाणिस्तानचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. आजही यश लाभेल अशी आशा असताना दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर अवघ्या ५६ धावा करून ऑल आउट होण्याचा नकोसा रेकॉर्ड अफगाणिस्तानच्या नावे झाला. यानंतर संघाचा कर्णधार रशीद खान हा भावुक झाल्याचे काही फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

अफगाण फिरकीपटू रशीदने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या X अकाउंटवर एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे. “आम्ही हा #T20WorldCup नेहमी लक्षात ठेवू! या संघातील प्रत्येकाने दिलेला लढा प्रशंसनीय आहे आणि मला सर्वांचाच खरोखर अभिमान आहे! आम्ही इथून पुढे संघाला आणखी मजबूत करण्यावर भर देऊ आणि पुढच्या काळात अधिक ताकदीने पुनरागमन करू. ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि लढा चालू ठेवण्यास आम्हाला मदत केली त्या प्रत्येकाचे आभार.”

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

रशीद खान पोस्ट

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा संघ ५६ धावांत तंबूत परतला होता. फक्त अजमातुल्ला उमरझाईला दुहेरी धावसंख्या (१०) नोंदवता आली. वेगवान गोलंदाज मार्को यान्सन, कागिसो रबाडा आणि अँनरिक नॉर्किया यांनी सात विकेट्स घेत प्रोटीज संघाला सहज विजय मिळवून दिला. रीझा हेंड्रिक्स (२९) आणि कर्णधार एडन मारक्रम(२३) यांनी ५७ धावांचे आव्हान ८.५ षटकांत पूर्ण करत अत्यंत साधा सहज विजय आपल्या नावे केला.

“आम्हाला हवं ते करू दिलं नाही पण..” , काय म्हणाला रशीद खान?

अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने सामन्यानंतरच्या सादरीकरणावेळी सांगितले की, “आम्हाला आणखी चांगली कामगिरी करता आली असती, परंतु परिस्थितीपुढे आम्ही हतबल झालो. टी २० क्रिकेट हे असंच आहे, तुम्हाला सर्व परिस्थितींसाठी तयार असणे आवश्यक आहे. मला वाटतं मुजीबची दुखापत आमच्यासाठी दुर्दैवी ठरली, पण आमचे सीमर्स आणि अगदी नबीनेही नवीन चेंडूनिशी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे फिरकीपटू म्हणून आमचे काम सोपे झाले. आम्ही या स्पर्धेचा आनंद लुटला. वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठणे आणि आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघासमोर खेळायला उभे ठाकणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही या पराभवातून शिकू.”

हे ही वाचा<< “विराट कोहली १५० किलोचे डंबेल उचलतो, पण रोहित शर्माचा एक पॅक..”, कपिल देव यांचं मोठं विधान; म्हणाले, “मर्यादांची..”

आयसीसीतर्फे आयोजित टी२० वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रोटीज संघाने पहिल्या उपांत्य फेरीत रशीद आणि कंपनीचा नऊ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.