Rashid Khan Statement on Brian Lara After Afganistan Win: अफगाणिस्तानने T20 World Cup 2024 मध्ये इतिहास रचत क्रिकेट जगताला चकित केले आहे. अफगाणिस्तानने आधी न्यूझीलंड संघाला मग माजी चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि आता बांगलादेशचा पराभव करत वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात अचानक एक नवा पाहायला मिळाला. एकीकडे भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारली, तर आता चौथा संघ अफगाणिस्तान ठरला आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी स्पर्धेच्या सुरूवातीला भाकीत केलं होतं की अफगाणिस्तानचा संघ सेमीफायनल गाठेल आणि रशीदसह संपूर्ण अफगाण संघाने हे भाकीत सत्यात उतरवलं. बांगलादेशवरील विजयानंतर रशीदने ब्रायन लारा यांच्या भाकीतावर मोठं वक्तव्य केलं.

विजयानंतर रशीद खान म्हणाला, “विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणे आमच्यासाठी स्वप्नासारखे आहे. एकंदरीत इथे पोहोचण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने स्पर्धेला सुरुवात केली. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.”

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

ब्रायन लारा यांना स्पर्धा सुरू असताना एकदा विचारण्यात आले होते की तुमच्या मते असे कोणते ४ संघ आहेत जे सेमीफायनल गाठतील. तेव्हा त्यांनी भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान हे संघ सेमीफायनलमध्ये असतील त्यांच भाकित होतं. त्यांनी सांगितलेले इतर ३ संघ साहाजिक होते पण अफगाणिस्तानच्या नावाने सर्वांनाच चकित केलं होतं. पण ब्रायन लारा यांच्या निवडीला अफगाणिस्तान खरं ठरवलं.

हेही वाचा – Afg vs Ban T20 World Cup: रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्डकप सेमी फायनल- अफगाणिस्तान संघाच्या विलक्षण प्रवासाची गोष्ट

यानंतर ब्रायन लारा यांच्याबद्दल रशीद म्हणाला, “ज्या व्यक्तीने आम्ही उपांत्य फेरी गाठू असा अंदाज वर्तवला होता ती एकमेव व्यक्ती म्हणजे ब्रायन लारा आणि त्यांचं भाकीत आम्ही खरं ठरवलं. या स्पर्धेपूर्वीच्या वेलकम पार्टीमध्ये जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं होतं, आम्ही तुमचा विश्वास खाली पडू देणार नाही. आम्ही सेमीफायनल गाठू आणि तुमची निवड योग्य होती हे सिध्द करू.”

रशीद पुढे म्हणाला की, “आम्ही १५-२० धावांनी मागे होतो. अशा स्थितीत एकूणच मन:स्थितीचा मुद्दा होता. आम्हाला माहित होते की बांगलादेश संघाला सुमारे १२ षटकांत लक्ष्य गाठायचे आहे आणि त्यांचे फलंदाज मोठे फटके खेळायला जातील आणि याचा आपण फायदा घेऊ शकतो. आम्हाला आमच्या रणनितीबद्दल स्पष्ट असणे आवश्यक होते. आम्ही आमचे प्रयत्न केले जे आमच्या हातात होते. प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केली.”

हेही वाचा – AFG v BAN: रशीद खानचं रौद्र रूप, फलंदाजाने धाव घेण्याचं नाकारताच बॅट फेकून मारली; VIDEO होतोय व्हायरल

एका प्रश्नाच्या उत्तरात रशीद म्हणाला की, “विशेषत: क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये आमच्याकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत. या सर्वांनी स्पर्धेत चांगली सुरुवात करून आमचा मार्ग अधिक सुकर केला. बांगलादेशविरुद्धच्या पाऊस सतत येत-जात राहिला, पण मानसिकदृष्ट्या आम्ही सामन्यात कायम होतो. आम्हाला दहा विकेट्स घ्यायच्या होत्या आणि उपांत्य फेरी गाठण्याचा हा एकमेव मार्ग होता. आम्ही ते करण्यात यशस्वी झालो याचा आम्हाला आनंद आहे.”

Story img Loader