Rashid Latif lashes out Pakistan cricket team : पाकिस्तानी संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतो. सध्या पाकिस्तानी संघ टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेला आहे. पाकिस्तानी संघ ६ जून रोजी टी-२० विश्वचषकात पहिला सामना खेळणार आहे. मात्र या सामन्याआधीच पाकिस्तानी संघाने एका खासगी डिनरचे आयोजन केले होते. जिथे त्याने चाहत्यांना भेटायला बोलावले. पण चाहत्यांना प्रवेश विनामूल्य नव्हता. पाकिस्तानी खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांकडून २५ डॉलर्स उकळण्यात आले. पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफच्या एका व्हिडीओवरून हा खुलासा झाला आहे.
रशीद लतीफने केला खुलासा –
पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रशीद लतीफ म्हणतो की त्याने अधिकृत डिनरबद्दल ऐकले आहे, परंतु ते एक खाजगी डिनर होते. हे कोणी केले. हे कोण करू शकेल? हा मूर्खपणा आहे. याचा अर्थ तुम्ही आमच्या खेळाडूंना २५ डॉलर्समध्ये भेटू शकता. अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल. काही गडबड झाली असती, तर लोक म्हणाले असते की खेळाडू अशा प्रकारे पैसे कमवतात.
रशीद लतीफ म्हणाले की चॅरिटी डिनर आयोजित करण्याची कल्पना समजू शकतो. पण पैसे घेऊन खाजगी डिनर आयोजित करणं समजण्यापलीकडचं होतं. लोक मला सांगतात की जो कोणी पाकिस्तानी खेळाडूंना फोन करतो. ते विचारतात किती पैसे देणार? आता ही प्रथा रूढ झाली आहे. जुना काळ वेगळा होता. पहिले २-३ डिनर आयोजित केले जायचे, ते पण अधिकृत असायचे. मात्र आता ही गोष्ट खूप हायलाइट झाली आहे. कारण हा अमेरिकेचा दौरा आहे. त्यामुळे हे करताना पहिल्यांदा विचार करुन करायला हवे होते. हे चॅरिटी डिनर नव्हते. त्यात पाकिस्तानचे नाव, पाकिस्तान क्रिकेटचे नाव आहे. त्यामुळे अशा चूक करू नका.
हेही वाचा – प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हनुमा विहारीला आंध्र प्रदेश संघाकडून NOC; राज्यातील सत्तांतराचा उल्लेख करत म्हणाला…
पाकिस्तानचा ९ जून रोजी भारताशी होणार सामना –
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ संघ अ गटात आहे. या गटात भारत-पाकिस्तानशिवाय आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेचे संघ आहेत. पाकिस्तानी संघ आपला पहिला सामना ६ जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. यानंतर ९ जून रोजी पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. ११ जूनला कॅनडा आणि १६ जूनला आयर्लंडविरुद्ध सामने खेळणार आहेत.