ऋषभ पंतने जवळपास १७ महिन्यांहून अधिक काळानंतर टी-२० विश्वचषकातून भारतीय संघात पुनरागमन केले. बऱ्याच काळानंतर पुनरागमन केल्यानंतरही त्याच्या कामगिरीत कोणतीच उणीव नव्हती. त्यापेक्षा उलट त्याने चांगली कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऋषभ पंतच्या शानदार पुनरागमनाबद्दल प्रशंसा केली. तर २६ वर्षीय खेळाडूने स्पर्धेसाठी किती मेहनती घेत तयारी केली हे सांगितले.
एका भीषण कार अपघातानंतर IPL 2024 मध्ये क्रिकेट मैदानावर पंतने पुनरागमन केल्यापासून पंतचा फॉर्म हा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा आहे. त्याच्या आयपीएलमधील फॉर्मने आधीच प्रभावित केल्यामुळे, पंत देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी टी-२० विश्वचषकात खेळताना दिसेल हे निश्चित होते. हा निर्णय अगदी योग्य ठरला असून पंतची विश्वचषकातील कामगिरी फारच कमालीची राहिली आहे.
हेही वाचा – IND vs CAN: पाऊस नसतानाही का रद्द झाला भारत वि कॅनडा सामना? जाणून घ्या कारण
आयपीएल 2024 मध्ये दिल्ली संघाचा कर्णधार म्हणून १३ सामन्यांमध्ये ४४३ धावा करत पंतला टी-२० विश्वचषकासाठी भारताकडून पुनरागमन करण्यात आले. यष्टीरक्षक-फलंदाजने भारताच्या सलामीच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध २६ चेंडूत नाबाद ३६ धावांच्या खेळीसह बॅटने चमकदार कामगिरीची श्रीगणेशा केला. त्यानंतर न्यूयॉर्कच्या अवघड खेळपट्टीवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ३१ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. फक्त फलंदाजीत नव्हे तर यष्टीरक्षण करतानाही पंतने सर्वांना चकित केले.
हेही वाचा – T20 WC 2024: “शाहीन नाराज, रिजवानला हवे होते कर्णधारपद” पाकिस्तान संघात दुफळी
कॅनडा विरुद्ध भारताच्या अंतिम गट सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, रवी शास्त्री यांनी खुलासा केला की त्याचे डीसी प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने पुनरागमन करण्यासाठी पंतने किती मेहनत घेतली याच्याविषयी उघड केले.
“मला वाटते की तो (ऋषभ) सर्वात प्रभावी खेळाडू आहे. पण त्याच यष्टीरक्षण कौशल्यही कमालीचं आहे. तो म्हणाला होता की, ‘तुम्हाला नेहमीच दोन संधी मिळत नाहीत. देव तुम्हाला जगण्यासाठी दोन संधी देत नाही.’ म्हणजेच जणू काही देव त्याला सांगत आहे, तू वर येण्यासाठी अजून खूप लहान आहेस. एक काम कर तू खालीच का नाही थांबत. तू छान क्रिकेट खेळ आपण नंतर भेटू आणि त्याला ही संधी देवाने दिली.,” असं शास्त्री म्हणाले.
माझ्यासाठी, जेव्हा मी ऋषभला अपघातानंतर ठीक झालेला पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा रिकी पॉन्टिंगने मला सांगितलं की तो दिल्लीच्या सोबत होता आणि तो स्वतःचा शेफसह आला होता. त्याला ती जाणीव आहे की तो उच्च स्तरीय क्रिकेट खेळायला आला आहे आणि पूर्वीपेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये त्याहूनही अधिक प्रगती तो करू पाहत होता. त्याला खूप जास्त कठोर मेहनत घ्यावी लागली आणि त्यामुळे हा सर्व फरक पडला आणि तो विलक्षण आहे. तो फलंदाजीमध्ये कसा एक्स फॅक्टर आणतो ते तुम्ही पाहू शकता. पण त्याचं यष्टीरक्षण सर्वांना चकित करणारं आहे. विशेषत: त्याचं फूटवर्क, तो ज्या पद्धतीने स्टंपच्या मागे असतो ते सोपं नाहीय. १८ महिन्यांपूर्वी, जेव्हा तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये पाहिले होते, तेव्हा तो परत येईल आणि खेळेल याची तुम्ही कल्पनाही कोणी केली नसेल,” शास्त्री पुढे म्हणाले.