IND vs SA Rohit Sharma Rishabh Pant Perfect Move: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना फोरच रोमहर्षक झाला. भारताने कडवी झुंज देत अखेरीस हा सामना ७ धावांनी जिंकला आणि भारताला टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेने बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध १७७ धावांचा यशस्वी पाठलाग करू पाहत होती. पण या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या संघात फलंदाजीची खोली नसल्यामुळे भारत वरचढ ठरला. हेनरिक क्लासेन तुफान फटकेबाजी करत असल्याने सामना अधिक रोमहर्षक झाला. पण हार्दिक त्याला बाद केल्याने भारताच्या विजयाची शक्यता वाढली. पण तत्त्पूर्वी मैदानात अशी एक घटना घडली, ज्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

अखेरच्या ४२ चेंडूंमध्ये ६८ धावांची गरज असताना आफ्रिकेच्या आशा पूर्णपणे हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरवर अवलंबून होत्या. मिलरने कुलदीप यादवला लागोपाठ चौकार लगावले तर अक्षर पटेलच्या स्पेलमधील शेवटच्या षटकात क्लासेनने २४ धावा केल्या, समीकरण ३० चेंडूत ३० धावांवर येऊन पोहोचले. सामन्यावर वर्चस्व असलेला भारतीय संघ यानंतर दबावाखाली आला होता. अगदी विजयाचा अंदाजही दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने होता आणि त्यांना विजयाची जवळपास ९० टक्के संधी होती. पण १७व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद केल्याने भारताने पुनरागमन केले. बुमराहने दोन किफायतशीर षटकेही टाकली आणि सामना पुन्हा भारताच्या हातात आला.

हेही वाचा – “…खूप अवघड असेल”, रोहितच्या टी-२० मधील निवृत्तीनंतर पत्नी रितिकाची भावुक पोस्ट, म्हणाली; “गेले काही महिने…”

हार्दिक आणि बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत चांगली कामगिरी केल्याचे श्रेय भारताला दिले जात असताना, कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या युक्तीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. पण सामन्याच्या वेळी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या समालोचनामध्ये त्यांनी याचा उल्लेख केला.

बुमराहच्या तिसऱ्या षटकानंतर, जेव्हा दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ षटकांमध्ये २६ धावांची गरज होती आणि क्लासेन आपल्या विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत होता. तेव्हा पंतने मेडिकल टाइम-आउट घेतला. फिजिओ त्याच्या गुडघ्याभोवती पट्टी गुंडाळण्यासाठी मैदानावर आला. यामुळे सामना सुरू व्हायला काही मिनिटांचा वेळ गेला आणि यादरम्यान कर्णधार आणि इतर खेळाडूंनी रणनिती आखली तसेच आफ्रिकेच्या फलंदाजांच्या फॉर्मवरही याचा परिणाम झाला. हे पाहताच भारत सामना स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शास्त्री यांनी सांगितले,. “भारतीय संघ जे शक्य आहे ते सर्व करत आहे, अगदी सामना स्लो डाऊन करण्याचा प्रयत्नही करत आहेत जेणेकरून ते या दोन स्फोटक फलंदाजांची लय तोडू शकतील.”

हेही वाचा – Team India: वर्ल्डचॅम्पियन भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला, ‘या’ कारणामुळे मायदेशी परतण्यास होतोय उशीर

काही मिनिटांनंतर सामना पुन्हा सुरू झाला आणि क्लासेनला पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंतकरवी हार्दिकने बाद केले, ज्यामुळे अखेरीस दक्षिण आफ्रिकेची खालची फळी कोलमडली. यानंतर बुमराहने पुढच्या षटकात मार्को यानसेनला बाद केले. तर हार्दिकने अखेरच्या षटकात आणखी दोन विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. यासह भारताने ७ धावांनी सामना जिंकून टी-२० विश्वचषक ट्रॉफीही उंचावली.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant medical time out delayed the game with perfect move and get klassen wicket rohit sharma ind vs sa final t20 world cup 2024 bdg
First published on: 01-07-2024 at 13:03 IST