T20 World Cup 2024, India Won Against Pakistan: भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्धच्या टी-२० विश्वचषकातील रोमहर्षक सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी चांगले क्षेत्ररक्षण करत सहज गाठता येणारे लक्ष्यही पाकिस्तानला गाठू दिले नाही. भारतीय संघात यंदाच्या वर्ल्डकपसाठीही पुन्हा एकदा बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्याची प्रथा परत आली आहे. भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप सामन्यात बीसीसीआयने सामन्यादरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला विशेष मेडल देण्यास सुरूवात केली होती. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्येही ही स्पर्धा कायम आहे. पााकिस्तानविरूद्ध सामन्यातील बेस्ट फिल्डर मेडल देण्यासाठी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित होते.

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले. ६२ वर्षीय रवी शास्त्री टी-२० विश्वचषकात कॉमेंट्री करत आहे. त्याला ड्रेसिंग रूममध्ये पाहून भारतीय संघातील खेळाडूंना आनंद झाला. या संघातील बहुतांश खेळाडू शास्त्री यांच्याच प्रशिक्षणाखाली खेळले आहेत. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी शास्त्री यांच्या ड्रेसिंग रुममध्ये येत असल्याचे जाहीर केले.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…

कोणाला मिळालं बेस्ट फिल्डरचं मेडल?

रवी शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचे मेडल दिले. एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे या टी-२० विश्वचषकातही प्रत्येक सामन्यानंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूला क्षेत्ररक्षण पदक दिले जाते. या सामन्यात यष्टिरक्षक ऋषभ पंतने हा पुरस्कार पटकावला. या सामन्यात पंतने तीन अप्रतिम झेल घेतले. फखर जमानचा अवघड झेल घेतल्यानंतर त्याने शादाब खानचाही एक उत्कृष्ट झेल घेतला. शेवटच्या षटकात एक ग्लोव्हज असूनही त्याने इमादला झेलबाद केले.

हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

पंतला मेडल दिल्यानंतर रवी शास्त्री भावुक होत म्हणाले, जेव्हा मी ऋषभच्या अपघाताची बातमी ऐकली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं. त्यानंतर जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये पाहिले तेव्हा त्याची प्रकृती अधिकच बिकट होती. त्यातून बाहेर येत तंदुरुस्त होऊन भारत आणि पाकिस्तानसारख्या मोठ्या सामन्यात शानदार कामगिरी करणे कौतुकास्पद आहे. तू फलंदाजी करण्यात माहीर आहेस हे सर्वांना माहीत आहे. तुझ्याकडे कोणता एक्स फॅक्टर आहे, हेही माहितीय. पण यष्टीरक्षणाच्या बाबतीत तू किती उत्कृष्ट पुनरागमन केलं आहेस हे पाहता, तू केलेली मेहनत स्पष्ट दिसून येत आहे. जगभरातील लाखो लोकांसाठी ते प्रेरणास्थान आहे.’

ऋषभ पंतने पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवलाच. पण त्याने सामन्यात फखर जमान, इमाद वसीम आणि शादाब खानचे झेलही घेतले. याशिवाय या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी केली. या सामन्यात पंतने ४२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्यामुळेच भारतीय संघ १०० हून अधिक धावा पार करू शकला. पंतशिवाय कोणत्याही खेळाडूला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही.