Riyan Parag Statement: रियान पराग क्रिकेटशिवाय त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. रियान परागने टी-२० वर्ल्ड कपवर मोठे वक्तव्य केले आहे. रियान परागला सध्या सुरू असलेल्या टी-२०विश्वचषक स्पर्धेतील टॉप चार संघांचा अंदाज वर्तवण्यास विचारले असता, त्याने वेगळीच प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की मला ही स्पर्धा पाहण्यात रस नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओ क्लिपमध्ये रियान परागने सांगितले की, जेव्हा तो स्वत: विश्वचषक खेळेल तेव्हा तो पहिल्या चार संघांचा विचार करेल. द भारत आर्मीसोबतच्या संभाषणात रियान पराग म्हणाला, ‘टॉप चार संघ कोण असतील हे सांगणं एक पक्षपाती उत्तर असेल, पण खरे सांगायचे तर मला वर्ल्ड कपही बघायचा नाही. शेवटी कोण जिंकते ते मी बघेन आणि त्याचा मला आनंद होईल. जेव्हा मी विश्वचषक खेळेन, तेव्हा मी अव्वल चार आणि या सर्वांचा विचार करेन’

Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Rohit Sharma Statement on Mohammed Shami Injury Said We Dont Want to Bring Injured Shami to Australia
Rohit Sharma on Mohammed Shami: “शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं शक्य नाही…”, रोहित शर्माने मोहम्मद शमीबद्दल केलं मोठं वक्तव्य, कर्णधार नेमकं काय म्हणाला?
Rishabh Pant Statement on T20 World Cup Final Injury Antics Told Physio I was Acting Rohit Sharma Claim Watch Video
Rishabh Pant: “शक्य तितका वेळ काढ…”, ऋषभ पंतचा टी-२० वर्ल्डकप फायनलमधील खोट्या दुखापतीबाबत खुलासा, फिजिओला पाहा काय म्हणाला होता?
cheers for Suraj Chavan's victory in Germany
“सुरजबरोबर प्रत्येक सामान्य व्यक्तीचा विजय”, जर्मनीमध्येही सुरज चव्हाणच्या विजयाचा जल्लोष, पाहा Viral Video
Rohit Sharma Statement on T20 World Cup Final He Allows Teammates To Sledge South Africa Batters
Rohit Sharma: “तुम्हाला हवं ते बोला, पंच-रेफरींना नंतर बघून घेऊ”, रोहितने खेळाडूंना वर्ल्डकप फायनलमध्ये शेरेबाजी करण्याची दिलेली सूट, स्वत: केला खुलासा
loksatta analysis why terrorism not ending
विश्लेषण : दहशतवाद संपुष्टात का येत नाही?
Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL

हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार

अलीकडेच परागने भारतीय संघाकडून खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते, काहीही झाले तरी तो एक दिवस भारतासाठी खेळणार आहे. पराग पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता, ‘एखाद्या वेळी तुम्हाला मला सोबत घेऊन जावे लागेलच, बरोबर? त्यामुळे मी भारताकडून खेळणार आहे, हा माझा विश्वास आहे. कधी याची मला पर्वा नाही.’

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, पंड्याच्या बायकोने इन्स्टाग्रामवर पुन्हा केला बदल, ‘ते’ फोटो…

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी होणार निवड?

आसामच्या २२ वर्षीय रियान परागने यंदा आयपीएल २०२४ मध्ये आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला. रियानने १५० च्या स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या. गेल्या दोन हंगामात राजस्थानकडून खेळताना रियान पराग फ्लॉप ठरला होता. २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पराग गेल्या पाच हंगामात काही विशेष करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून फक्त १६०, ८६, ९३, १८३, ७८ धावा आल्या. पण यंदा त्याने सराव करत केलेली चांगली कामगिरी पाहता त्याची भारताच्या टी-२० संघात निवड होण्याची दाट शक्यता आहे. अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांच्यासह टी-२० विश्वचषकानंतर होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे.