ICC T20 World Cup 2024, IND vs AUS: भारताने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेमध्ये चांगल्या धावा चोपल्या. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शला झेलबाद करण्याच्या २ संधी भारताने गमावल्या. यष्टिरक्षक ऋषभ पंतने एक महत्त्वाचा झेल सोडला, त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच भडकला आणि त्याने भर मैदानात पंतला शिवीगाळ केली. रोहित शर्माच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०५ धावा केल्या. रोहित शर्माच्या ९२ धावांच्या धुव्वाधार खेळीच्या जोरावर भारताने ही मोठी धावसंख्या उभारली. रोहितने या ९२धावांच्या खेळीसह अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. भारतीय संघाने दुसऱ्या डावात गोलंदाजी करत टी-२० विश्वचषकात अनेक सामने सहज जिंकले आहेत. पण आजच्या सामन्यात दोन झेल सुटल्यानंतर रोहित शर्माचा रूद्रावतार पाहायला मिळाला.

हेही वाचा – IND v AUS: कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला

भारतने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सहा धावांवर पहिला धक्का बसला. अर्शदीप सिंगने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. मात्र, त्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतने मोठी चूक केली, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मा संतापलाऑस्ट्रेलियाच्या डावाचे दुसरे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला होता. कर्णधार मिचेल मार्शला त्याने पहिला चेंडू टाकला. भारतीय गोलंदाजाने चेंडू टाकला, ज्यावर फलंदाजाने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडूचा वेग आणि अतिरिक्त उसळीमुळे चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर आदळला आणि हवेत उंच उडाला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. अशा स्थितीत सोप्या झेलची संधी निर्माण झाली होती. हा झेल टिपण्यासाठी ऋषभ पंत पुढे धावला, मात्र तोल गेल्याने तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि मिचेल मार्शला जीवदान मिळाले.

हेही वाचा – IND v AUS: हिटमॅनच्या तडाख्यात स्टार्क-कमिन्स घायाळ; टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज

त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा अजिबात खूश दिसत नव्हता. त्याने ड्रॉप झालेला कॅच पाहताच शिवीच घातली. विकेटकीपरने कॅच सोडल्यानंतर कॅमेरा कर्णधाराकडे वळवला असता रोहित त्याला बडबडताना आणि त्याच्याकडे रागाने पाहताना दिसला. त्याचवेळी आता या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकेच नव्हे तर रोहित शर्माने त्या षटकानंतर ऋषभ पंत जवळ जाऊन त्याला समजावतानाही दिसला.