Rohit Sharma Bhangra dance video viral: टी-२० विश्वचषक विजयानंतर भारतीय संघ दिल्लीत पोहोचला आहे. कॅरेबियन बेटावर आलेल्या बेरिल वादळामुळे अंतिम सामन्यानंतर ३ दिवस बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया अखेर गुरुवारी भारतात परतली. दिल्लीला पोहोचल्यानंतर खेळाडू विश्रांतीसाठी हॉटेल आयटीसी मौर्या येथे पोहोचले आहेत. तत्त्पूर्वी टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावरही चाहत्यांनी गर्दी आणि जल्लोष करत स्वागत केलं. यानंतर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरचा रोहित शर्माचा आणि इतर खेळाडूंचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Team India at Delhi Live: टीम इंडियाच्या खेळाडूंचा भांगडा, हॉटेलबाहेर नाचतानाचा Video व्हायरल

भारतीय संघ दिल्लीत पोहोचल्यानंतर हॉटेलमध्येही संघाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोलांच्या गजरात संघाचं स्वागत केलं आणि काही जण पंजाबी वेशात भांगडाही करत होते. त्यांच्यासोबत भारतीय खेळाडूसुद्धा ढोलाच्या तालावर भांगडा करताना दिसत होते. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने तर दणकावून डान्स केला, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

टीम इंडिया एका खास चार्टर्ड फ्लाइटने बार्बाडोसहून नवी दिल्लीत पोहोचली आहे, जिथे आज संपूर्ण टीम पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. दरम्यान, भारतीय संघ दिल्लीत दाखल होणार असल्याची बातमी चाहत्यांना मिळताच त्यांनीही विश्वविजेत्या संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली होती. यानंतर खेळाडू आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचताच ढोल वाजवले जात होते आणि त्यांचं स्वागत केलं जातं होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव ढोलाच्या तालावर नाचताना दिसले. या दोन खेळाडूंचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – Rohit Sharma: “उद्या संध्याकाळी मरीन ड्राईव्हला…”, रोहित शर्माकडून क्रिकेटरसिकांना वर्ल्डकप विजयाच्या सेलिब्रेशनचं निमंत्रण

भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. तर याशिवाय संघाने ११ वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद मिळवत ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. याआधी महेंद्रसिंग धोनीने भारताला टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले होते. धोनीनंतर आता रोहित शर्माने भारताला आयसीसीचे जेतेपद पटकावून दिले आहे.