Rohit Sharma Virat Kohli Viral Video of T20WC 2024 Final: टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यातील एक व्हीडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून सर्वच भारतीय चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. भारतीय संघाने २९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले. हा अंतिम सामना भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा अखेरचा टी-२० सामना ठरला. या सामन्यानंतर आणि भारताने टी-२० विश्वचषक पटकावल्यानंतर रोहित आणि विराटने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या होत असलेल्या या व्हायरल व्हीडिओवरून दोन्ही खेळाडूंना आपला अखेरचा टी-२० सामना असणार याची आधीच खात्री होती.
फायनलपूर्वीचा विराट-रोहितचा भावूक करणारा व्हीडिओ व्हायरल
अंतिम सामन्यात कोहलीने ७६ धावांची खेळी खेळली ज्यामुळे भारताला सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. दुसरीकडे, रोहित ९ धावा करत बाद झाला. विराट कोहली आणि रोहित शर्माचा व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली अंतिम सामन्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात जाताना दिसत आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांना हात मिळवत मिठी मारली. शेवटचा टी-२० सामना खेळण्यापूर्वी खेळपट्टीवर पोहोचताच दोन्ही फलंदाज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. ज्यात म्हटले की या दोन्ही फलंदाजांनी आधीच ठरवले होते की हा त्यांचा शेवटचा टी-२० सामना असेल. तर अनेकांनी म्हटलं की लाइव्ह सामना पाहताना आम्ही हा क्षण पाहण्याचं राहून गेलं.
टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका होती. कोहली संपूर्ण स्पर्धेत खराब फॉर्मशी झुंजत होता. पण जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यात ५९ चेंडूत ७६ धावा करून संघाला चॅम्पियन बनवले. या कामगिरीसाठी विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
We failed to notice, but in the finals, before taking the stance, both of them slightly hugged.
— Irroh (@irroh45) July 7, 2024
Giving a little fist bump is normal, but usually no pair hugs like that. Perhaps cause they knew it was gonna be their last in this format.??pic.twitter.com/m3nd9v4rxD
दुसरीकडे, रोहित शर्माने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने ८ डावात २५७ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी ३६.७१ होती तर स्ट्राइक रेट १५६.७० होता. रोहित शर्मा हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने एक खेळाडू म्हणून दोन टी-२० विश्वचषक जिंकली आहेत. याआधी त्याने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ चे विजेतेपदही पटकावले होते.