T20 World Cup 2024, IND vs SA Final: टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावत भारतीय संघाने इतिहास रचला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने आफ्रिकन संघाचा ७ धावांनी पराभव करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविजेते होण्याचा मान मिळविला. या जेतेपदासह भारतीय संघाने आयसीसीच ट्रॉफीचा दुष्काळही संपवला आहे. आयसीसी टूर्नामेंटच्या गेल्या तीन अंतिम सामन्यांमध्ये भारताने धडक मारली पण जेतेपदापासून दूर राहिले. पण वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाने अखेरीस विजयाचा झेंडा फडकवला. रोहित शर्मासह भारताचे सर्वच खेळाडू या विजयानंतर भावुक झाले. या विजयासह रोहित शर्माने इतिहास रचला आहे.

रोहित शर्माने आत्तापर्यंत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६२ सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघाने ५० सामने जिंकले आहेत. यासह भारतीय संघ अंतिम सामना विजय मिळवला आणि कर्णधार म्हणून रोहितचा हा ५०वा विजय असेल आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये हा टप्पा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजयाचा विक्रम ७८ टक्के राहिला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ४८ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने याआधीच उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी करून टी-२० विश्वचषकाच्या एका सीझनमध्ये भारतीय कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम मोडला होता आणि यंदाच्या मोसमात भारतासाठी आता सर्वाधिक भावा करणारा खेळाडूही ठरला.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

हेही वाचा – T20 World Cup Prize Money: भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकताच कोट्यवधींचा वर्षाव, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी बक्षिसाची रक्कम

कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय

५० – रोहित शर्मा (भारत)
४८ – बाबर आझम (पाकिस्तान)
४५ – ब्रायन मसाबा (युगांडा)
४४ – इऑन मॉर्गन (इंग्लंड)

भारतासाठी टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर राहिला आणि त्याने कर्णधार म्हणूनही चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माने या मोसमात २५० धावांचा आकडा पार केला आहे, तर सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तर ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती, वर्ल्डकप विजयानंतर ‘रो-को’ चा भारतीय चाहत्यांना धक्का

या विश्वचषकात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ८ सामन्यांच्या ८ डावात ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७० च्या स्ट्राईक रेटने एकूण २५७ धावा केल्या. रोहित शर्माने या दरम्यान ३ अर्धशतके झळकावली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९२ धावा होती. या खेळीत त्याने २४ चौकार आणि १५ षटकारही मारले. रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता तर एकूण सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा- Rahul Dravid: ट्रॉफी हातात घेत राहुल द्रविडची सिंहगर्जना; क्रिकेटप्रेमींनी शांत, संयमी द्रविडचा असा अवतार कधीच पाहिला नसेल, VIDEO व्हायरल

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

३१९ – विराट कोहली (२०१४)
२९६ – विराट कोहली (२०२२)
२७३ – विराट कोहली (२०१६)
२५७ – रोहित शर्मा (२०२४)
२३९ – सूर्यकुमार (२०२२)
२२७ – गौतम गंभीर (२००७)
२१९ – सुरेश रैना (२०१०)
२०० – रोहित शर्मा (२०२४)

Story img Loader