सहज, खणखणीत आणि देखणी फटकेबाजी कशी करावी याचा वस्तुपाठ रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० वर्ल्डकपच्या सुपर८ गटाच्या लढतीत सादर केला. ४१ चेंडूत ९२ धावांच्या तडाखेबंद खेळीसह रोहितने १९ नोव्हेंबरला जे काम अपुरं राहिलं होतं ते पूर्ण केलं. वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये रोहितने अशीच सनसनाटी सुरुवात केली होती. मात्र ट्रॅव्हिस हेडच्या झेलमुळे रोहितची खेळी संपुष्टात आणली. सोमवारी सेंट ल्युसियात २०६ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडने ४३ चेंडूत ७६ धावांची सुरेख खेळी साकारली. एका बाजूने सहकारी परतत असतानाही हेड चौकार-षटकार मारत राहिला. पण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने शांतपणे झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. हेड तंबूत परतताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.

19 नोव्हेंबर- अहमदाबाद- वनडे वर्ल्डकप फायनल
सलग १० सामने जिंकून भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. भारतीय संघाचा प्रवास स्वप्नवत असा होता. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पहिलं षटक सावधपणे खेळून काढलं. दुसऱ्या षटकात हेझलवूडच्या गोलंदाजीवर डाऊन द ट्रॅक येत चौकार खेचला. पुढच्याच चेंडूवर रोहितने मारायच्या पट्यात आलेला चेंडू डीप मिडविकेट क्षेत्रात भिरकावून दिला. हेझलवूडच्या पुढच्या षटकात रोहितने शांत सुरुवात केली. मात्र पाचव्या चेंडूवर आवडता पूलचा फटका मारुन षटकार लगावला. याचीच री ओढत सहावा चेंडू हेझलवूडच्या डोक्यावरून मारत चौकार वसूल केला.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
India Beat Australia by 21 Runs and Enters in T20 World Cup Semi Final in Marathi
IND vs AUS: भारताने विश्वविक्रमासह सेमीफायनलमध्ये ऐटीत मारली धडक, ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित-कुलदीप ठरले मॅचविनर
Rohit sharma statement on India win
IND v AUS: “आम्ही ऑस्ट्रेलियाला ओळखून आहोत…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आम्हाला जे करायचं होतं”
Rohit Sharma Becomes the First Batsman to hit 600 Sixes in International Cricket
T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
IND vs ENG Match Highlights, Shoaib Akhtar Reaction
“हिंदुस्थान जिंकल्याचा मला..”, म्हणत शोएब अख्तरने पोस्ट केलेला Video चर्चेत; माजी पाक खेळाडूने विचारलं, “कुणी हा सल्ला..”

पुढच्या षटकात स्टार्कने शुबमन गिलला बाद केलं. पण त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने लाँगऑफ क्षेत्रात खणखणीत षटकार सादर केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ग्लेन मॅक्सवेलकडे चेंडू सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुसऱ्याच चेंडूवर लाँगऑन क्षेत्रात षटकार हाणला. पुढच्याच चेंडूवर देखणा कव्हर ड्राईव्ह मारला. तिसऱ्या चेंडूवर रोहित फटका मारण्यासाठी पुढे सरसावला. रोहित चेंडू टाईम करू शकला नाही. चेंडू उंच हवेत उडाला. कव्हर क्षेत्रात उभ्या असलेल्या ट्रॅव्हिस हेडने मागे धावत जाऊन अफलातून झेल टिपत रोहितची खेळी संपुष्टात आणली. रोहितने ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. रोहितच्या खेळीवर बाकी फलंदाजांनी पायाभरणी करणं आवश्यक होतं पण तसं झालं नाही. बाकी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि भारतीय संघाला २४० धावाच करता आल्या. या पराभवाचा सल रोहितच्या मनात प्रदीर्घ काळ होता. हे त्याने बोलूनही दाखवलं. भारतीय संघाचा तो पराभव देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या चाहत्यांसाठी अविश्वसनीय असा होता.

२४ जून २०२४, सेंट ल्युसिया
भारतीय संघाला सेमी फायनल प्रवेशासाठी विजय अनिवार्य लढतीत रोहित शर्माने वादळी खेळी साकारली. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर प्रचंड हल्ला चढवला. रोहितने त्याच्या एका षटकात २९ धावा चोपून काढल्या. या आक्रमणाने ऑस्ट्रेलियाला डावपेच बदलावे लागले. स्टार्कचा सहकारी आणि ऑस्ट्रेलियाचा अन्य प्रकारातील कर्णधार पॅट कमिन्सचंही रोहितने षटकाराने स्वागत केलं. पूल, हूक, स्ट्रेट ड्राईव्ह, कट, इनसाईड आऊट अशा भात्यातल्या सगळ्या फटक्यांना न्याय देत रोहितने डोळ्यांचं पारणं फेडणारी खेळी केली. फिरकीपटू अॅडम झांपालाही रोहितने लक्ष्य केलं. रोहितच्या धुवाधार आक्रमणामुळे बाकी फलंदाजांना स्फुरण चढलं आणि त्यांनीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. वनडेत तीन द्विशतकं नावावर असणाऱ्या रोहितचं आज शतक झालं नाही पण शतकापेक्षाही मौल्यवान खेळी करत तो संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.