IND vs PAK Score Updates: टी-२० विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. सध्याच्या घडीला १ षटकं खेळून झाल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला. तर सामना सुरू होण्याआधीही पावसाच्या सरी आल्या होत्या. नाणेफेकीदरम्यान विसरभोळ्या रोहितचा पुन्हा एकदा किस्सा घडला.
नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हलक्या पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला. पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम ६-१ असा आहे. उभय संघांमधील मागील पाच टी-२० विश्वचषक सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल
विसरभोळा रोहित शर्मा<br>दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले तेव्हा एक मजेशीर घटना घडली. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांची त्यांच्या खास शैलीत ओळख करून दिली. यानंतर नाणेफेकीची वेळ आली. तर रोहित शर्माने समोर नाणे घेण्यासाठी हात पुढे केला, मग बाबरने रोहितला नाणं त्याच्याकडे असल्याचे सांगितले. मग त्याने त्याचा खिसा शोधण्यास सुरुवात केली. यावर रोहितने खिशात हात घालून एक नाणे काढले. यानंतर नाणेफेक करण्यात आली. नाणेफेक केल्यानंतर पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. नाणे फेकल्यानंतर बाबरने हेड्स म्हटलं. शेवटी निकाल त्याच्या बाजूने लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्माने एकदा तर नाणेफेकीच्या वेळेस काय निवडायचं हेच तो विसरला होता. २१ जानेवारी २०२३ रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही नाणेफेक दरम्यान रोहितचा विसरभोळेपणा दिसला होता. नाणेफेक झाल्यानंतर फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हे ठरवायचे ते विसरले. बराच वेळ तो विचार करत राहिला. शेवटी त्याला गोलंदाजी घ्यायची होती हे आठवले.
#BabarAzam has won the toss & it's a no-brainer decision to bowl first!
— Star Sports (@StarSportsIndia) June 9, 2024
Good toss to win on this pitch as both teams look to refurbish the #GreatestRivalry!
The match will begin at 8:50 PM IST because of a slight rain delay! (No overs lost)#INDvPAK | LIVE NOW |… pic.twitter.com/LzC0faqwkh
सलामीला उतरताना रोहित शर्माने पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीला नेस्तनाबूत केले. पहिल्याच षटकात त्याने षटकार खेचला आणि एकूण ८ धावा केल्या. यात तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार खेचत रोहितने शाहीनवर दबाव आणला. रोहितच्या या षटकारावर स्टेडियममध्ये आवाज घुमला, १२२ डेसिबल इतक्या आवाजासह चाहत्यांनी जल्लोष केला. मात्र, त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंना परतावे लागले.