IND vs ENG Match Highlights: रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत २०२२ च्या उपांत्य फेरीतील पराभवाचा मोठा बदला घेतला. भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. रोहित ड्रेसिंग रूमबाहेर एकटाच बसला होता. विराट कोहली हात मिळवायला जाताच रोहितने हात डोळ्यावर घेतले आणि विराट त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसला. रोहितचा ड्रेसिंग रूमबाहेरील हा फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत आहे.

भारताच्या विजयानंतर भावुक झालेल्या रोहित शर्माला विराटने सावरलं…

रोहितच्या सामन्यानंतरच्या या व्हायरल फोटोमध्ये तो मान खाली घालून हात डोळ्यावर घेऊन बसल्याचे दिसत आहे. त्याच्या बाजूला विराट कोहली उभा आहे. जो त्याच्याशी बोलताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. तर चाहत्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य, म्हणाला – “१५ वर्ष खेळलेल्या…”

सोशल मीडियावर रोहित-विराटच्या या फोटोला करोडो चाहते लाइक करत आहेत. मैदानावर आणि मैदानाबाहेर दोघांमध्ये अनेकवेळा चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळालं आहे. रोहितच्या या फोटोने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपचीही आठवण करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम पराभवानंतर तो रडताना दिसला होता. मात्र, तेव्हा दु:खाचे अश्रू होते आणि यावेळी आनंदाचे विजयाश्रू होते. रोहितचा हा फोटो व्हायरल झाला असून चाहतेही भावूक झाले आहेत.

हेही वाचा – IND vs ENG: “उपर डाला तो देता हूं ना…” हिटमॅन शब्दाचा पक्का, रोहितने सूर्याला सांगून लगावला दणदणीत षटकार; VIDEO व्हायरल

इंग्लंडविरुद्धच्या या शानदार विजयानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक होत आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखालील संघाने चमकदार कामगिरी करत १० वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. याशिवाय गेल्या दोन सामन्यांमध्ये रोहितने सलग अर्धशतके झळकावत भारताला मोठी धावसंख्या रचण्याचा पाया घालून दिला. रोहितने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातही शानदार ५७ धावांची खेळी करत सूर्यासोबत चांगली भागीदारी रचली. जेणेकरून भारतीय संघ इंग्लंडला १७२ धावांचे आव्हान देऊ शकला. तर प्रत्युत्तरात अक्षर आणि कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संघ १०३ धावा करत ऑल आऊट झाला.