Rohit Sharma 1st player to play most T20 World Cup : टीम इंडियाने टी-२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत टी-२० विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध खेळायला उतरताच इतिहास रचला. खरं तर, तो टी-२० सलग नववा हंगाम खेळणारा पहिला फलंदाज ठरला. १९ सप्टेंबर २००७ रोजी डर्बन येथे इंग्लंडविरुद्ध त्याने टी-२० विश्वचषकात पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो टी-२० विश्वचषकाच्या प्रत्येक हंगामाचा भाग आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा दुसरा हंगाम आहे.

हा विक्रम फक्त दोन खेळाडूंच्या नावावर आहे –

रोहित व्यतिरिक्त, पहिल्या हंगामापासून टी-२० वर्ल्ड कपचा प्रत्येक हंगाम खेळणारा दुसरा खेळाडू बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसन आहे. मात्र, बांगलादेशचा संघ अद्याप यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सामना खेळलेला नाही. त्यामुळे ही कामगिरी करणारा रोहित पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेश ८ जूनला श्रीलंकेविरुद्ध आपल्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. शाकिब जेव्हा त्या सामन्यात खेळेल, तेव्हा ही कामगिरी करणारा तो रोहितनंतरचा दुसरा खेळाडू ठरेल.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Farmer leader Vijay Javandhia referenced Varhadi poet Vitthal Waghs poem in his comment in nagpur
”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

रोहित शर्माची टी-२० विश्वचषकातील कामगिरी –

रोहित शर्माने आतापर्यंत टी-२० विश्वचषकात एकूण ३६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३४.३९ च्या सरासरीने ९६३ धावा केल्या आहेत. हिटमॅनने या काळात ९ अर्धशतकेही झळकावली आहेत. रोहित अजूनही या मेगा टूर्नामेंटमधील पहिल्या शतकाच्या शोधात आहे. जर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे, तर तो धावांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १५१ सामन्यांच्या १४३ डावांमध्ये ३,९७४ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहितने वर्ल्ड कपमध्ये ३७ सामने खेळले आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024 : अरे हे काय! आऊट झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर ओमानच्या ड्रेसिंग रूमकडे निघाला, VIDEO होतोय व्हायरल

टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने पूर्ण केल्या ४००० धावा –

आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात २६ धावा करत रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो विराट कोहली आणि बाबर आझमनंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या टी-२० क्रिकेटमध्ये ४०३८ धावा आहेत, तर बाबर आझमने टी-२० मध्ये एकूण ४०२३ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आपल्या १५२व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर रोहितने सर्वात कमी चेंडू खेळून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने २८६१ चेंडूत ४००० धावांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा – IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार

रोहितने धोनीचा विक्रम मोडत रचला इतिहास –

रोहित शर्माने आतापर्यंत ५५ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या काळात टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाखाली ४३ सामने जिंकले आहेत. तर एमएस धोनीने ७२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. या काळात त्याने ४२ सामने जिंकले होते. अशा परिस्थितीत या यादीत एमएस धोनीला मागे टाकत रोहित शर्माने इतिहास रचला आहे. तो भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा चौथा कर्णधार ठरला आहे. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वलस्थानी आहे.