Rohit Sharma Kuldeep Yadav Video: टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेतील भारताचे साखळी टप्प्यातील चारही सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. तत्त्पूर्वी भारताने वर्ल्डकप जर्सीमध्ये फोटोशूट केले. त्यादरम्यानचा रोहित शर्मा आणि कुलदीप यादवचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात रोहित शर्मा कुलदीपची मस्करी करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीने भारताच्या निवडक खेळाडूंना काही खास कॅप दिल्या आहेत. ज्यामध्ये कुलदीप यादवला आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर २०२३ ची कॅप मिळाली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या २०२३ च्या वनडे टीम ऑफ द इयरमध्ये कुलदीपचा समावेश होता. ही कॅप रोहितने कुलदीपला यादवला दिली. ही कॅप रोहितने सन्मानपूर्वक कुलदीपला दिल्यानंतर त्याला २ शब्द बोलण्यास सांगितले. कुलदीपने बोलता बोलता आपल्या गोलंदाजीसह फलंदाजीची सुद्धी प्रशंसा केली. हे ऐकून रोहितने त्याची मजा घ्यायला सुरूवात केली.

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

कुलदीप यादव म्हणाला, “माझ्याकडे बोलण्यासारखे फार काही नाही. गेल्या वर्षात मी बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली.” इकडे कुलदीपचे बोलणे ऐकून रोहितला धक्काच बसला. तो कुलदीपला अडवत म्हणाला, ‘कधी फलंदाजी कधी केली?’ रोहितचं बोलणं ऐकून कुलदीपही गोंधळला. मग म्हणाला, “कसोटी कसोटी मालिकेत.”

तितक्यात रोहित म्हणाला, “ही कॅप वनडेसाठी आहे.” त्यावर कुलदीप म्हणाला, “पण मी बॅटनेही कामगिरी केली. म्हणजेच गेल्यावर्षी वर्ल्डकपमध्ये मी बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली.”

हेही वाचा – निवृत्ती जाहीर केलेल्या धवल कुलकर्णीची मुंबई रणजी संघात पुन्हा एन्ट्री

कुलदीपचं वाक्य ऐकून रोहित म्हणाला, “मी संघाचा कर्णधार आहे आणि मी कुलदीपला वर्ल्डकपमध्ये फलंदाजी करताना पाहिलं नाही. मला नाही माहित हा नेमकं काय बोलतोय.” असे म्हणत रोहित शर्मा व्हीडिओमधून जातो. तेवढ्यात कॅप वर करत कुलदीप म्हणतो “थँक्यू रोहित भाई”.

कर्णधार रोहितने कुलदीप यादवची चांगलीच फिरकी घेतली, हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागले आणि आता आयसीसीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

भारतीय संघ ५ जूनपासून टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरूद्ध असणार आहे. तत्त्पूर्वी १ जूनला भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघाचे जवळपास सर्वच खेळाडू वर्ल्डकप संघात दाखल झाले आहेत. फक्त विराट कोहली अद्याप संघात सामील झालेला नाही. आता सराव सामन्यापूर्वी विराट संघात दाखल होणार का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma hilariously roast kuldeep yadav in viral video ahead of t20 world cup 2024 bdg