Rohit Sharma Retired Hurt After Fifty due to Injury: भारतीय संघाने नासाऊ क्रिकेट स्टेडियमच्या अवघड खेळपट्टीवर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा आठ विकेट्स राखून पराभव करत सामना जिंकला. टीम इंडियाने हा सामना ८ विकेटने सहज जिंकला. भारत जिंकला असला तरी पण भारतासाठी टेन्शन वाढवणारी घटना घडली. भारताच्या आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला फलंदाजी करताना दुखापत झाली आणि रोहित फिजिओसोबत मैदान सोडताना दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भेदक गोलंदाजीसह भारताने आयर्लंड संघाचा डाव ९६ धावांवर आटोपला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी टिचून मारा करत एकाही फलंदाजाला मैदानात टिकू दिले नाही. भारताच्या चारही वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपने एका षटकात २ विकेट्स घेत भारताला विकेट मिळवून देण्याचा श्रीगणेशा केला. त्यानंतर हार्दिक पंड्याने ३ विकेट बुमराह आणि अर्शदीपने २ विकेट तर सिराज आणि अक्षरने एकेक विकेट घेतली.

आयर्लंडने दिलेल्या ९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विराट आणि रोहितची जोडी उतरली. विराट कोहली पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात २ धाव घेत झेलबाद झाला. येथील खेळपट्टीवर धावा करणे अजिबातच सोपे नव्हते पण रोहित शर्मा टिकला आणि आपल्या एकापेक्षा एक सरस फटकेबाजीच्या जोरावर शानदार अर्धशतक झळकावले. रोहित शर्माने अवघ्या ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रोहितने अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर तो पुल शॉट मारायला गेला पण चेंडू थेट रोहित शर्माच्या खांद्यावर जाऊन आदळला. यानंतर ब्रेक झाला. पण ब्रेकमध्ये प्रशिक्षकांशी आणि फिजिओशी चर्चा करत रोहित शर्माने रिटायर्ड हर्ट होत माघारी जाण्याचा निर्णय घेतला. भारताला विजय मिळवून दिला आणि रोहितला मात्र दुखापत झाली. रोहित खांदा धरून मैदानाबाहेर जाताना दिसला. त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला पण तोही मोठा फटका खेळत तंबूत परतला. रोहितनंतर ऋषभने डावाची जबाबदारी सांभाळली आणि विजयी षटकारासह संघाला विजय मिळवून दिला.

विजयानंतर रोहित शर्मा मैदानात खेळाडूंना हात मिळवताना दिसला. तर सोबतच सामन्यानंतर बोलताना त्याने सांगितले की हो हाताला थोडंसं दुखणं आहे. रोहित शर्माची ही दुखापत साधारण असून रोहित पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma injured in ind vs ire match got retired hurt after smashing half century t20 world cup 2024 bdg