Rohit Sharma Invites Indian Fans to celebrate T20 World Cup win: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४चे जेतेपद पटकावत ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. २९ जुलै रोजी बार्बाडोस येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यानंतर कॅरेबियन बेटावरील बेरिल वादळामुळे संघ ३ दिवस बार्बाडोसमध्येच अडकला होता. यानंतर बीसीसीआय आणि जय शाह यांनी एअर इंडियाच्या एका खास चार्टर्ड विमानाची व्यवस्था केल्याने भारतीय संघ मायदेशी यायला निघाला आहे. उद्या गुरूवारी भारतात परतल्यानंतर भारतीय संघ विजयी परेड मुंबईत करणार आहे. यासाठी रोहित शर्माने संपूर्ण देशवासियांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्ह येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो”

भारतीय संघ बार्बाडोसहून दुपारच्या वेळात आज मायदेशी रवाना झाला आहे. ४ जुलैला गुरूवारी सकाळी भारतीय संघ दिल्लीत दाखल होणार आहे. तिथून मग संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सकाळी ११ वाजता भेट घेईल आणि त्यानंतर मुंबईसाठी रवाना होईल आणि यानंतर मरीन ड्राईव्ह नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी खुल्या बसमधून भारतीय संघाची विजयी परेड असेल. यानंतर टीम इंडियासाठी वानखेडेवर खास कार्यक्रमाेच आयोजन केले आहे. यानंतर जय शाह यांनी जाहीर केलेल्या १२५ कोटींचे जाहीर केलेले बक्षीस भारतीय संघाला देण्यात येईल. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही याबाबत एएनआयसह बोलताना माहिती दिली. यानंतर आता रोहित शर्माने खास पोस्ट करत चाहत्यांना उद्या एकत्र जमण्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

रोहित शर्माने एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितले, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग ४ जुलैला संध्याकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया.”

??, we want to enjoy this special moment with all of you.

So let’s celebrate this win with a victory parade at Marine Drive & Wankhede on July 4th from 5:00pm onwards.

It’s coming home ❤️?
— Rohit Sharma (@ImRo45) July 3, 2024

टीम इंडियाचे ४ जुलैला भारतात दाखल झाल्यानंतरचे वेळापत्रक

पहाटे संघ दिल्लीत दाखल होणार
११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुंबईसाठी रवाना.
विमानतळावरून वानखेडेकडे रवाना
एनसीपीए नरिमन पॉईंट ते वानखेडे विजयी परेड.
वानखेडे स्टेडियमवर छोटासा कार्यक्रम

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma invites indian fans to celebrate t20 world cup 2024 win at marine drives on 4 july 5 pm with special post bdg