ICC Player of the month Award for June 2024 : हिटमॅन रोहित शर्मा त्याच्या संपूर्ण आयुष्यात जून २०२४ चा महिना विसरू शकणार नाही. रोहित शर्माने २९ जून रोजी टी-२० विश्वचषक विजेतेपद जिंकले आणि इतिहासाच्या पानांसह तसेच भारताच्या काही यशस्वी कर्णधारांच्या यादीत सामील झाला. २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोहितने केवळ कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणूनही चमकदार कामगिरी केली आणि भारताला टी-२० विश्वविजेता बनवले.

आता टी-२० विश्वचषक २०२४ संपल्यानंतर, आयसीसीने तीन खेळाडूंना जून महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ विजेतेपदासाठी दावेदार म्हणून नामांकित केले आहे. रोहित शर्मासह या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह आणि रहमानउल्ला गुरबाज यांचाही समावेश आहे. आता या तिघांपैकी कोणाची जून महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Jalaj Saxena Becomes 1st Player With 6000 Runs and 400 Wickets in History of Ranji Trophy
Ranji Trophy: केरळच्या जलाज सक्सेनाने रणजी ट्रॉफीत घडवला इतिहास, आजवर कोणालाच नाही जमलं ते करून दाखवलं

भारताकडून रोहितने सर्वाधिक धावा केल्या आहेत –

भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल बोलायचे तर, २०२४ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान, त्याचे कर्णधारपद उत्कृष्ट होते आणि तो अपराजित राहिला आणि तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील होता. रोहित शर्माने या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यात ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने २५७ धावा केल्या. या विश्वचषकात रोहितची सर्वात संस्मरणीय खेळी कांगारू संघाविरुद्धची सुपर ८ सामन्यात होती, ज्यात त्याने ४१ चेंडूत ९२ धावा केल्या होत्या. त्याने उपांत्य फेरीतही शानदार फलंदाजी केली आणि इंग्लंडविरुद्ध ३९ चेंडूत ५७ धावा केल्या.

हेही वाचा – टीम इंडियासह फोटोशूट करताना पंतप्रधान मोदींच्या ‘या’ कृतीने वेधले सर्वांचे लक्ष, फोटो व्हायरल झाल्याने होतयं कौतुक

जसप्रीत बुमराह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला –

जसप्रीत बुमराहच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी १५ विकेट्स घेतल्या आणि तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. आयसीसीनेही त्याला प्लेअर ऑफ द मंथ किताबासाठी नामांकन दिले आहे. बुमराहने संपूर्ण स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली. भारत जेव्हा जेव्हा अडचणीत दिसला तेव्हा त्याने विकेट्स घेतल्या आणि जवळपास प्रत्येक सामन्यात असे घडले. त्याने ८ सामन्यात ८.२६ च्या सरासरीने आणि ४.१७ च्या इकॉनॉमीने १५ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Jasprit Bumrah : पंतप्रधान मोदींनी ‘ज्युनियर’ बुमराहवर केला प्रेमाचा वर्षाव, जसप्रीतच्या मुलाला कडेवर घेतलेला फोटो व्हायरल

गुरबाजने या स्पर्धेत केल्या सर्वाधिक धावा –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाजची कामगिरी अप्रतिम होती. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. गुरबाजने आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपल्या संघासाठी धावा करत राहिला. गुरबाजने या स्पर्धेत २८१ धावा केल्या आणि टी-२० विश्वचषकाच्या एकाच मोसमात त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. गुरबाजने या मोसमात खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांमध्ये ३५.१२ च्या सरासरीने आणि १२४.३३ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.