Rohit Sharma Kisses Hardik Pandya Video Viral : तो क्षण आला आहे ज्याची चाहते वाट पाहत होते. २०२३ च्या विश्वचषकातील पराभवानंतर भारताने आता २०२४ च्या विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह भारतीय संघ दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या विजयानंतर भारतीय खेळाडू खूप भावुक दिसत होते. त्याचवेळी सामना संपल्यानंतर चाहत्यांची मने जिंकणारे दृश्य पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पंड्या आणि रोहित शर्माचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वास्तविक, विजयानंतर रोहित शर्माने हार्दिक पंड्याचे चुंबन घेतले. हा असा प्रसंग होता की, ते पाहून चाहते भावुक झाले. टी-२० विश्वचषक सुरु होण्याआधी हार्दिक आणि रोहितबद्दल खूप चर्चा झाली होती की दोघांचे संबंध चांगले नाहीत, पण देशासाठी खेळताना दोन्ही खेळाडूंनी अफवा दूर ठेवल्या आणि एकत्र खेळले. या विश्वचषकात हार्दिक पंड्या अष्टपैलू कामगिरी करत सर्वांच लक्ष वेधले. कारण टी-२० विश्वचषक सुरु होण्यापूर्वी झालेल्या आयपीएल २०२४ च्या हंगामात तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळी करत टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

हार्दिकने क्लासेनला बाद करत सामन्याला कलाटणी दिली –

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हेनरिच क्लासेनने वादळी अर्धशतक झळकावून टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या होत्या. तो जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ बाजी मारेल असे वाटत होत. पण घातक ठरत असलेल्या हेनरिच क्लासेनला आऊट करण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने चेडू हार्दिक पंड्याच्या हाती सोपवला. यानंतर हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाज हेनरिच क्लासेनला बाद करून सामन्याला कलाटणी दिली. त्याबरोबर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. यामुळेच कर्णधार रोहित शर्मा हार्दिक पंड्यावर भलताच खूश दिसत होता. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते कौतुक करत आहेत.

हेही वाचा – IND vs SA Final : विराट कोहली-अर्शदीप सिंगने केला भांगडा, ‘तुनक तुनक’ गाण्यावर डान्स करतानाचा VIDEO व्हायरल

‘माझ्यासाठी हा अतिशय भावुक करणारा क्षण’ –

विजयानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, ‘माझ्यासाठी हा अतिशय भावुक करणारा क्षण आहे. काहीतरी कुठेतरी चुकत होतं. पण आजचा दिवस खास होता. अख्खा देश भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होता. गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात जे जे घडलं ते पाहता हा विजय माझ्यासाठी विलक्षण असा आहे. मी कशाबद्दलही एक अक्षरही बोललो नाही. माझ्यावर अन्याय झाला. पण मला माहिती होतं की माझा दिवस येईलच. वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत, देशाच्या विजयात योगदान देता येण्यासारखा दुसरा आनंद नाही. आम्ही गेले वर्ष यासाठी कसून मेहनत करत होतो. आम्ही शांतचित्ताने फायनलमध्ये खेळलो. दडपणाने खचून गेलो नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये कशी बॉलिंग करायची याची तयारी केली होती. माझा रनअपचा स्पीड अचानकच वाढला. मी याआधीही अशा परिस्थितीत गोलंदाजी केली आहे, तो अनुभव कामी आला’.