Rohit Sharma Rahul Dravid New York Rain Video: टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ न्यूयॉर्कला पोहोचला आहे. भारताचे खेळाडू तीन तुकड्यांमध्ये याठिकाणी पोहोचले. पहिल्या तुकडीत राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि कोचिंग स्टाफसह आयपीएलच्या प्राथमिक फेरीतून बाहेर पडलेले संघातील खेळाडू होते. तर उर्वरित खेळाडू पुढील दोन दिवसांमध्ये संघात दाखल झाले.भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करेल. २००७ पासून भारतीय संघाला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही आणि यावेळी रोहित शर्माचा संघ हा विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल अशी सर्वांना आशा आहे.

दरम्यान, भारतीय संघाने न्यूयॉर्कमध्ये पोहोचून प्रशिक्षण सुरू केले आहे. न्यूयॉर्कमधील रोहित शर्मा आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कच्या मुसळधार पावसात रोहित आणि द्रविड टॅक्सीसाठी धावताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Puneet Superstar eating bread with mud shocking video goes viral
फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी हद्द पार केली! बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटनं चिखलात ब्रेड बुडवून खाल्ला; VIDEO पाहून झोप उडेल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
lucknow passenger and conductor fight in roadways bus video viral
बसमध्ये तिकिटावरून राडा! कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – T20 WC 2024: “मी संघाचा कर्णधार आहे…”, रोहित शर्मा सर्वांसमोर कुलदीपला पाहा काय म्हणाला; VIDEO व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित आणि राहुल मुसळधार पावसात हॉटेलमध्ये टॅक्सीची वाट पाहत आहेत. रोहित हॉटेलचा दरवाजा उघडून टॅक्सीला हात दाखवताना दिसत आहे. दरम्यान, भर पावसातच रोहित शर्मा दरवाजा उघडून धावत जाऊन टॅक्सीमध्ये बसतो. लगेच मागून राहुल द्रविडही धावत जाऊन टॅक्सीमध्ये बसतात. रोहित आणि द्रविड यांचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून चाहते कमेंट्सही करत आहेत.

टीम इंडिया १ जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या स्पर्धेसाठी विराट कोहली अद्याप भारतीय संघात सामील झालेला नाही, तर इतर सर्व खेळाडू येथे पोहोचले आहेत.

हेही वाचा – गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा प्रक्षिक्षक होण्याच्या चर्चेदरम्यान गांगुलीने BCCI चे कान टोचले; म्हणाला, “थोडं समजुतदारपणे…”

या विश्वचषकात भारतीय संघ आपला दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ९ जून रोजी खेळणार आहे. अमेरिकेतील क्रिकेटच्या मैदानावर हे दोन्ही देश पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान ७ वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने या ७ पैकी ५ वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे, तर पाकिस्तानला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमधील एक सामना बरोबरीत सुटला होता. भारत-पाकिस्तान सामना कायम हायव्होल्टेज सामना म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद