Rohit sharma reaction on Suryakumar Yadav Catch Video: सूर्यकुमार यादवचा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील अविश्नसनीय झेल अजूनही सगळीकडे तितकाच चर्चेचा विषय आहे. खेळाडूंपासून क्रिकेट दिग्गजांपर्यंत तसेच चाहतेही सूर्याच्या हा कॅच पाहून प्रभावित झाले आहेत. सूर्यकुमार यादवच्या या कॅचचा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल होत झाला आहे. पण याचदरम्यान आता सूर्यकुमार यादव हा झेल टिपण्यापूर्वी रोहित शर्माची प्रतिक्रिया कशी होती, या अँगलने चाहत्यांनी स्टॅन्डसमधून टिपलेला एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिक शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. पहिल्याच चेंडूवर मिलरने लॉग ऑनच्या दिशेन एरियल शॉट लगावला. जिथे सूर्याने हवेत उडी मारली आणि दोन प्रयत्नात यशस्वीपणे झेल टिपला. सूर्याने घेतलेला हा कॅच सामन्याचा टर्निंग पॉइंट मानला ठरला. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये रोहित शर्माची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. जेव्हा सूर्या हा करिष्माई झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यापूर्वी मिलरचा मोठा फटका पाहून रोहित भलताच निराश झाला आणि तो खाली वाकून गुडघ्यावर ठेवून थांबला, सर्वांप्रमाणेच मिलरने मारलेला जोरदार फटका सीमारेषेबाहेर जाणार असे रोहितलाही वाटत होते. रोहितने सर्व आशा सोडून दिल्याचे दिसत होते. आता हा षटकारासाठी चेंडू बाहेर गेला तर सामना हातातून निसटणार असे चित्र डोळ्यासमोर आले होते.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सूर्या झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना रोहितने त्याच्या जागेवरून खाली वाकून कॅचकडे एक कटाक्ष टाकला. रोहितचा ही प्रतिक्रिया पाहून त्याची त्यावेळी काय अवस्था झाली असेल याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. पण सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपत सर्वांनाच विजयाची निश्चितता मिळवून दिली. सूर्यानेही त्याच्या या उत्कृष्ट झेलच्या वेळेस रोहित शर्माही लॉग ऑनवर फिल्डिंगसाठी होता आणि तेव्हा काय घडलं यावर प्रतिक्रिया दिली होती.
Rohit Sharma brother literally lost all the hopes. Thank you Surya Dada. pic.twitter.com/iKRxJ0BHcl
— R A T N I S H (@LoyalSachinFan) July 2, 2024
सूर्याच्या अखेरच्या षटकातील या झेलनंतर अखेरीस हा सामना भारताने ७ धावांनी जिंकण्यात यश मिळवले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा केल्या. या सामन्यात कोहलीने ७६ धावांची खेळी केली होती. विराटला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजांनीही अप्रतिम गोलंदाजी करत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. या सामन्यात हार्दिक पंड्या तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला. याशिवाय बुमराहला दोन, अर्शदीपला दोन आणि अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.