ICC T20 World Cup 2024, IND vs AUS: गगनचुंबी षटकार, आक्रमक फलंदाजी आणि हिटमॅन स्टाईल फटकेबाजीच्या जोरावर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ४१ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने विक्रमी ९२ धावा केल्या. सुपर८ मधील महत्त्वाच्या सामन्यातील रोहित शर्माच्या फटकेबाजीने सर्वांनाच प्रभावित केले. रोहितच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर पॉवरप्लेमध्येच त्याने ६० धावा केल्या. तर रोहितने अवघ्या १९ चेंडूत दणदणीत अर्धशतक झळकावले.
सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आहे. विराट टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात संघाला वेगवान सुरुवात करून दिली. सामन्याच्या सुरुवातीलाच त्याने असा विक्रम आपल्या नावावर केला आहे जो याआधी कोणत्याही खेळाडूच्या नावावर नव्हता.
या सामन्यात रोहित शर्माने १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सर्वात जलद अर्धशतक आहे. रोहितने भारतीय डावाच्या ५व्या षटकातच अर्धशतक झळकावले. यंदाच्या टी-२० विश्वचषकातील हे सर्वात जलद अर्धशतक देखील आहे. रोहितने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ९२ धावांच्या या खेळीत रोहितने ५ षटकार लगावत इतिहास रचला. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये २०० षटकार पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २०० षटकार पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माने विक्रमांचा पाडला पाऊस
T20I मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज
२०० षटकार – रोहित शर्मा<br>१७३ षटकार – मार्टिन गुप्टिल
१३७ षटकार – जोस बटलर
१३२ षटकार – निकोलस पूरन
१३० षटकार – ग्लेन मॅक्सवेल</p>
सर्वाधिक बाऊंड्री
रोहित शर्माने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही केला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर टी-२० वर्ल्ड कपमध्ये १४२ चौकार आहेत. पण रोहित शर्मा आता त्याच्याही पुढे गेला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषकात सर्वाधिक चौकार
१४८ चौकार- रोहित शर्मा
१४२ चौकार – डेव्हिड वॉर्नर<br>१४१ चौकार – ख्रिस गेल
१३७ चौकार -विराट कोहली
टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक
युवराज सिंग- १२ चेंडूत इंग्लंड विरुद्ध
केएल राहुल- १८ चेंडू विरुद्ध स्कॉटलंड
रोहित शर्मा- १९ चेंडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध
युवराज सिंग- २० चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सूर्यकुमार यादव- २३ चेंडू झिम्बाब्वे विरुद्ध