Rohit Sharma Special Welcome at Home: भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर मुंबईत त्याच्या घरी विशेष स्वागत करण्यात आलं, ज्याचा व्हीडिओ सध्या समोर आला आहे. रोहितचे बालपणीचे मित्र, मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा खेळाडू तिलक वर्माने खास अंदाजात स्वागत केलं. बेरील चक्रीवादळामुळे कॅरेबियनमध्ये तीन दिवस अडकल्यानंतर भारतीय संघ अखेरीस ४ जुलैला भारतात परतला.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”

विश्वविजेत्या संघाचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर भारतीय संघ मुंबईकडे रवाना झाला. जिथे संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यांतून चाहते या विश्वविजेत्या संघाच्या स्वागतासाठी आणि कौतुकासाठी हजर होते. यानंतर संघाची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिमय अशी विजयी परेड सुरू झाली. हजारो चाहत्यांना अभिवादन करत आणि त्यांच्यासोबत हा विजय साजरा करत संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला. हा कार्यक्र झाल्यानंतर सर्व खेळाडू घरी परतले.

हेही वाचा – हार्दिकवर चाहत्याने फेकला शर्ट? हे पाहताच बुमराहची प्रतिक्रिया होतेय व्हायरल; पाहा VIDEO

सर्व कार्यक्रम संपल्यानंतर, कर्णधार रोहित शर्माचे आणखी एक विशेष स्वागत झाले तिलक वर्मा, रोहित शर्माचा लहान भाऊ आणि त्याच्या बालपणीच्या मित्रांनी रोहितचा फोटो असलेली एक खास जर्सी घातली होती. यानंतर सर्व मित्रांनी एका रांगेत उभे राहून त्याला भव्य सलामी दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, हा गट रोहितकडे WWE दिग्गज रिक फ्लेअरच्या प्रसिद्ध ‘स्ट्रट’ ची नक्कल करत चालताना दिसत आहे. म्हणजेच ज्या पद्धतीने रोहित शर्मा भारताच्या मैदानावर टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी घेण्यासाठी हळूहळू जाताना दिसला. तशी अॅक्शन करत त्यांनी पुढे जाऊन रोहित शर्माला खांद्यावर उचलले आणि त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला. यानंतर रोहितच्या स्वागतासाठी घराच्या दरवाज्यापासून आतपर्यंत फुलांनी सजावट करण्यात आली होती.

हेही वाचा – टीम इंडियात १२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचे वितरण कसे होणार? कोणाला किती मिळणार पैसे? जाणून घ्या

रोहित शर्माने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितने यंदाच्या विश्वचषकात दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने या टूर्नामेंटमध्ये तीन अर्धशतकांसह ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७० च्या स्ट्राईक रेटने ८ डावांत २५७ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्माने संघाला स्फोटक सुरुवात दिली, याचसोबत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातील त्याची ९२ धावांची खेळी सर्वांच्याच लक्षात राहणारी आहे.

Story img Loader