Rohit Sharma Statement on India win: टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ फेरीतील सलग दुसरा सामना भारताने जिंकला आहे. भारताने अँटिगामध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशविरूद्ध ५० धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सर्वच फलंदाजांनी धावांची भर घालत भारताची धावसंख्या १९६ पर्यंत नेली. भारताच्या धावसंख्येत सर्वात मोठं योगदान हार्दिक पंड्याने दिलं. हार्दिकने झंझावाती अर्धशतक झळकावत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. तर रोहित शर्मा २३, विराट कोहली ३७, ऋषभ पंत ३६ आणि शिवम दुबे ३४ धावांचे योगदान दिले. या सहज मिळवलेल्या विजयानंतर रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. या विजयासह भारताचे पहिल्या गटात दोन सामन्यातील दोन विजयांसह चार गुण झाले असून संघ अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया एका विजयासह दोन गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
भारताच्या विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा
रोहित शर्मासह भारताच्या सर्वच फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. याबद्दल बोलतानाच रोहित म्हणाला, “मी बऱ्याच दिवसांपासून बॅटने आक्रमक खेळण्याबद्दल बोलत आहे. सर्व गोष्टींचा विचार करता, आम्ही परिस्थितीशी जुळवून घेत खरोखरच चांगले खेळलो. इथे वाऱ्याचा थोडासा प्रभाव आहे, एकूणच आम्ही खूप हुशारीने खेळत आहोत. एकूणच आम्ही बॅट आणि बॉलसह चांगली कामगिरी केली.”
यासह टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरवर रोहित शर्मा म्हणाला, “आठही फलंदाजांना त्यांची भूमिका चोख पार पाडायची आहे, मग काहीही होवो. आम्ही पाहिले की एका खेळाडूने ५० धावा केल्या आणि आम्ही १९६ धावा केल्या. माझ्या मते तरी टी-२० मध्ये अर्धशतके आणि शतके झळकावण्याची गरज नाही, तुम्ही गोलंदाजांवर किती दबाव टाकता हे महत्त्वाचे आहे. सर्व फलंदाज सुरुवातीपासून असेच खेळत आले आहेत आणि आम्हालाही असंच खेळत राहायचं आहे. संघात खूप अनुभवी खेळाडू आहेत आणि संघ त्यांना पाठिंबा देतो.”
Rohit Sharma said "In T20I, you don't need fifties or hundreds – it's about putting pressure on bowlers, that is how we need to play, that is how we want to encourage ourselves to play going forward". [Answering to question the number of balls faced by a batter was 28] pic.twitter.com/itIGg9RJV7
— Johns. (@CricCrazyJohns) June 22, 2024
हार्दिक पंड्याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “गेल्या सामन्यातही मी म्हणालो की, त्याच्या चांगल्या फलंदाजीने संघाला चांगल्या स्थितीत आणले आहे. टॉप५,६ फलंदाजांनंतर सामन्याला एक चांगला फिनिश देण्याची गरज आहे, हार्दिक हा हार्दिक आहे, आम्हाला माहित आहे की तो काय करण्यास सक्षम आहे. तो संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, तो अशीच कामगिरी करत राहिल आणि संघाला एका चांगली धावसंख्या गाठण्यात मदत करेल.”