India vs Pakistan T20 World Cup match at Nassau County Cricket Stadium: टी-२० विश्वचषक २०२४ मधील हायव्होल्टेज सामना आज म्हणजेच ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या या सामन्याची चाहत्यांना फार आतुरता असते. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. अमेरिकेविरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर पाकिस्तान संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. पण भारत पाकिस्तानपेक्षा कायमचं वरचढ राहिला आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. फलंदाजांसाठी या खेळपट्टीवर धावा काढणं प्रचंड कठीण असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही खेळपट्टीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एखादा सामना म्हटल्यावर पिच कसं असेल, कोणते खेळाडू खेळतील तसेच नाणेफेक जिंकल्यावर काय निर्णय घेणार हे देखील महत्त्वाचं असतं, त्यामुळे रोहितचं हे वक्तव्य संघासहित चाहत्यांनाही टेन्शन देणारं आहे.

भारताचा पहिला सामना न्यूयॉर्कच्या या नासाऊ काऊंटी क्रिकेट खेळपट्टीवर आयर्लंडविरूद्ध झाला होता. या सामन्यात खेळपट्टीवर भयंकर बाऊन्स पाहायाला मिळत होता. जोशुआ लिटीलच्या बाऊन्सवर रोहित शर्माच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला. तर ऋषभ पंतच्या हातावरही बाऊन्सवर आदळला होता. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत आयर्लंडच्या धावांवर वचक बसवला. आयरिश संघ १०० धावाही पार करू शकला नाही आणि ९६ धावांवर ऑल आऊट झाला. तर प्रत्युत्तरात रोहितच्या अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

भारताचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत खेळपट्टीबद्दल सांगितले की, मी स्वत: खेळपट्टीच्या क्युरेटरशी बोललो होतो, ज्यांना सामन्याच्या दिवशी ड्रॉप-इन खेळपट्टी कशी खेळेल याची त्यांनाही कल्पना नव्हती. रोहित शर्मा पाकिस्तानविरूद्ध सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाला, “आम्ही कोणत्या खेळपट्टीवर खेळू हे आम्हाला अद्याप माहित नाही. आम्ही क्युरेटर्सशी बोललो आणि ते स्वतःच खेळपट्टी कशी असेल याबद्दल संभ्रमात होते. मग आमची स्थिती काय असेल याची फक्त कल्पना करा, कारण आपण अशा देशात आलो आहोत जिथे आपल्याला ड्रॉप-इन खेळपट्ट्यांची फारशी ओळख नाही.”

हेही वाचा – आझम खान: घराणेशाहीचा आरोप होणारा वजनदार कार्यकर्ता का होतो ट्रोल?

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमची खेळपट्टी सध्या चर्चेत आहे. यावर गोलंदाजांना मोठी मदत मिळत आहे. या मैदानावर आतापर्यंत दोन सामने झाले असून दोन्ही डाव शंभर धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत. मात्र, ८ जूनला कॅनडा आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात खेळपट्टी थोडी चांगली दिसली. पण एकूणच या मैदानात गोलंदाजांचे वर्चस्व राहील. विशेषत: पहिल्या डावात फलंदाजांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, धावा काढणे सोपे नसेल. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल.

Story img Loader