Rohit sharma on Suryakumar yadav catch in Maharashtra Legislature: टी-२० विश्वचषक २०२४ च्या जेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. बार्बाडोसमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने या विजयासह १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. बार्बाडोसमधील अंतिम फेरीनंतर संघ दुसऱ्या दिवशी मायदेशी परतला होता. पण तेथील वादळानंतर संघ तिथून उशिरा भारतीय संघात मायदेशी आला. ४ जुलै म्हणजेच कालचं संघ भारतात आला आणि त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर मुंबईत संघाचं जंगी स्वागत झाल्यानंतर आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव या ४ मुंबईकर खेळाडूंचा स्वागत केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी या ४ खेळाडूंनी पहिली भेट दिली, जिथे त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर विधी मंडळात या चारही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर रोहित शर्माने सर्वांशी मराठीत संवाद साधला.

हेही वाचा – VIDEO: टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये कोणी गार्डनमध्ये फिरलं का? रोहित शर्मा म्हणाला, “मला असा संघ मिळाला…”

सगळीकडे अजूनही सूर्यकुमार यादवच्या अखेरच्या षटकातील त्या कॅचची चर्चा आहे. त्याने डेव्हिड मिलरने लगावलेल्या मोठ्या कॅच घेत भारताच्या विजयावर शिक्का मारला. रोहित शर्माने या विधीमंडळातील वक्तव्यादरम्यान सूर्यकुमार यादवच्या झेलवर मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा विधीमंडळातही बोलायला पुढे आला तेव्हा त्याच्या नावाचा जयजयकार सुरू होता. मराठीत संवाद साधताना रोहित शर्मा म्हणाला, “सगळ्यांना माझा मोठा नमस्कार. आम्हाला इथे येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. सर्वांनाच भेटून बरं वाटलं. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मला आताच सांगितलं की असा कार्यक्रम इथे कधी झाला नाही. त्यामुळे असा कार्यक्रम आमच्यासाठी इथे ठेवला हे पाहून आम्हालाही आनंद झाला. जसं की मी आधी सांगितलं सर्वांना इथे पाहून आम्हाला आनंद झालाय. काल आम्ही मुंबईमध्ये जे अनुभवलं ते सर्वांसाठीचं एक स्वप्न होतं. आमच्यासाठीही ते एक स्वप्न होतं की वर्ल्डकप भारतात आणायचा आहे. ११ वर्ष आम्ही या या वर्ल्डरपसाठी आम्ही थांबलो होतो, २०१३ मध्ये आम्ही अखेरची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.”

“मी सर्वांचा खूप आभारी आहे, संघातील सर्व खेळाडूंचा आभारी आहे. हे माझ्यामुळे, सूर्यामुळे, शिवम दुबे किंवा जैस्वालमुळे घडलेलं नाही. सगळ्या खेळाडूंमुळे आम्ही वर्ल्डकप जिंकलो. मी भाग्यवानही आहे कारण जो संघ मला मिळाला त्यातील सर्व खेळाडू कमाल होते. सगळ्यांनीच जेव्हा संघाला गरज होती एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी करत संघाला सावरायचं होतं, तेव्हा वेगवेगळ्या खेळाडूने वेगवेगळ्या प्रकारे योगदान दिलं आणि संघाला विजय मिळवून दिला.”

हेही वाचा – VIDEO: जगज्जेत्या कर्णधाराचं घरी साजेसं स्वागत; बालपणीच्या मित्रांनी केला सॅल्युट, फुलांनी सजवलं घर

सूर्याच्या कॅचवर बोलताना रोहित म्हणाला, “सूर्याने आता सांगितलं की बरं झालं त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं तो बॉल बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवला असता.” असं म्हणताच विधीमंडळासह रोहित शर्माही जोरजोरात हसू लागला.

सूर्याच्या वक्तव्याने शेवट करत रोहितने भाषण थांबवलं. शेवटी त्याने सर्वांचेच आभार मानले तसेच त्याने मुंबईचेही आभार मानत जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत त्याचं भाषण थांबवलं.