भारत आणि इंग्लंडमध्ये टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या आहेत. रोहित शर्माचे शानदार अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या खेळीसह भारताने चांगली धावसंख्या उभारली. तर हार्दिक आणि जडेजानेही चांगली फलंदाजी केली. पण रोहित आणि सूर्यकुमारच्या फलंदाजीदरम्यान एक किस्सा घडला, ज्यात रोहित शर्माचा आवाज स्टंप माईकवर रेकॉर्ड झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यातील ११व्या षटकात हा किस्सा घडला. इंग्लंडकडून फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोन ११ वे षटक टाकत होता. या षटकादरम्यान रोहित शर्मा आणि सूर्या यांच्यातील संभाषण स्टंप माईकवर रकॉर्ड झाले आहे. यादरम्यान रोहित शर्मा सूर्याला म्हणाला, ‘उपर डाला तो देता हूं ना.’ चेंडू जर वर पिच झाला तर मोठा फटका खेळतो असं सूर्याला रोहितने सांगितलं. यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर लाँग ऑफवर षटकार ठोकला. रोहितच्या या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तर लिव्हिंगस्टोनला लगावलेला षटकारही कमाल होता.

लिव्हिंगस्टोनने दडपण कायम राखत सहावा चेंडू टाकला आणि रोहितने म्हटल्यानुसार षटकार मारत लाँग-ऑनवर एक दणदणीत फटका मारत षटकार लगावला. रोहित आणि सूर्यकुमार यांच्यातील भागीदारीमुळे भारताला एक चांगली धावसंख्या गाठता आली. रोहित शर्माने ३९ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ५७ धावा केल्या. तर सूर्यकुमारने त्याला चांगली साथ देत ३६ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह ४७ धावा करत बाद झाला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma stump mic upar dale to deta hai na said to suryakumar yadav and hits six on next ball ind vs eng t20 world cup 2024 bdg
First published on: 28-06-2024 at 01:02 IST