T20 World Cup 2024, IND vs SA Final: बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानाने २९ जून २०२४ ला इतिहास घडताना पाहिलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना ७ धावांनी जिंकून टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा १२ वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळही संपवला. या विजयानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना तो खूप भावूक झाला होता, ज्यामध्ये विजयाच्या आनंदामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. आता रोहितचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये तो बार्बाडोसच्या खेळपट्टीसमोर नतमस्तक झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर रोहित शर्माचा एक खास व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. यामध्ये रोहित खूप भावूक दिसत होता, तर त्याच्या भावनाही स्पष्ट चेहऱ्यावर दिसत होत्या. रोहितने बार्बाडोस स्टेडियमच्या खेळपट्टीच्या मातीची चव चाखली. रोहितने खाली खेळपट्टीवर बसत तेथील मातीचा तोंडाने स्पर्श केला आणि त्याला नमस्कार केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रोहितच्या भावनांचीही कल्पना येऊ शकते. या सामन्यात जरी रोहितला बॅटने विशेष काही करता आले नसले तरी कर्णधारपदाच्या बाबतीत त्याने तो नेहमीप्रमाणेच प्रभावी ठरला.

हेही वाचा – T20 World Cup Prize Money: भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकताच कोट्यवधींचा वर्षाव, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी बक्षिसाची रक्कम

रोहित शर्माने विजयानंतर प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचसारखे सेलिब्रेशन केले. ज्याप्रमाणे रोहितने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीच्या मातीची चव चाखली, त्याचप्रमाणे ग्रँड स्लॅमच्या विजयानंतरही नोवाक असेच काहीसे सेलिब्रेशन करतो.

रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तमाम भारतीय चाहत्यांना सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचीही आठवण झाली, जेव्हा तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना खेळला आणि हा सामना संपल्यानंतर तो खेळपट्टीवर गेला आणि त्याने नमन केले. विराट कोहलीने रोहितसह अंतिम सामन्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma takes a bite of barbados pitch after t20 world cup win video viral ind vs sa bdg