South Africa vs England T20 World Cup 2024 Highlights: दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत अखेरच्या दोन षटकांत इंग्लंडच्या जबड्यातून विजय हिसकावून आणला. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकही सामना न गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने उत्कंठावर्धक सामन्यात इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवला. कगिसो रबाडा आणि मार्को यान्सन यांच्या १८व्या आणि १९व्या षटकाने दक्षिण आफ्रिकेला सामन्यात परत आणले. तर नॉर्कियाने अखेरच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. या षटकातील मारक्रमच्या झेलने सामना फिरवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडचा संघ ४ बाद ६१ धावांवर होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रुक यांनी शानदार भागीदारी रचत इंग्लंडला सामन्यात परत आणले पण विजय मिळवून देऊ शकले नाहीत. १७ व्या षटकात बार्टमनने २१ धावा देत सामना इंग्लंडच्या बाजूने वळवला पण आफ्रिकेच्या रबाडाने आपली कामगिरी पार पाडली. त्याने १८व्या षटकात दुसऱ्याच चेंडूवर त्याने लिव्हिंगस्टोनला स्ट्ब्सकरवी झेलबाद केले आणि इंग्लंडला मोठा धक्का दिला. यासह या षटकात त्याने अवघ्या ४ धावा दिल्या. यानंतर यान्सनने १९व्या षटकात अवघ्या ७ धावा देत मोठा फटका खेळण्याची एकही संधी दिली नाही आणि इथे इंग्लंडचा संघ मागे पडला.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना नॉर्कियाच्या पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रुक झेलबाद झाला. मागे धावत जात मारक्रमने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत सीमारेषेवर अनपेक्षित झेल टिपला. हॅरी ब्रुक अर्धशतक झळकावत ३७ चेंडूत ७ चौकारांसह५३ धावांवर झेलबाद झाला आणि इथेच सामना फिरला. मारक्रमच्या या झेलने सामना आफ्रिकेच्या खिशात घातला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक चौकार सॅम करनने लगावला. पण यानंतर नॉर्कियाने चांगली गोलंदाजी करत धावा रोखल्या आणि संघाला अखेरीस ७ धावांनी विजय मिळवून दिला. तर आफ्रिकेला चांगली सुरूवात करून देणाऱ्या क्विंटन डीकॉकला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

हेही वाचा – IND v AFG: भारताच्या विजयानंतर जडेजाने ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडला थेट उचलून घेतलं, पण नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

आफ्रिकेने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात फारच खराब झाली. संघाचे टॉप ४ फलंदाज २० धावांचा आकडाही गाठू शकले नाहीत आणि स्वस्तात बाद झाले. यानंतर आलेल्या हॅरी ब्रुक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यातील मोठ्या भागीदारीने इंग्लंडला सामन्यात परत आणले हे दोघेही बाद झाल्यानंतर इंग्लंडने हाता-तोंडाशी आणलेला सामना गमावला. आफ्रिकेकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कगिसो रबाडा आणि केशव महाराज आणि प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर बार्टमन आणि नॉर्किया यांच्या खात्यात एक विकेट आहे. मार्को यान्सेन विकेट घेतली नसली तरी त्याने १९वे षटक इतके जबरदस्त टाकले की आफ्रिकेने सामन्यात कमबॅक केले.

हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण

तत्त्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरूवात तशी चांगली झाली. संघाचा सलामीवीर क्विंटन डीकॉकने शानदार फटकेबाजी वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने २२ चेंडूत अर्धशतक झळकावले. तर ३८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. तर रीझा हेंड्रिक्सने १९ धावांचे योगदान दिले. तर मिलर आणि क्लासेन एक धाव चोरत असताना क्लासेन धावबाद झाला. यानंतर मिलरने २८ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या आणि संघाला १५० पार नेले. मारक्रम आणि यान्सन स्वस्तात बाद झाले. यासह दक्षिण आफ्रिकेच्या धावांवर अंकुश ठेवत इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली आणि आफ्रिकेचा संघ केवळ १६३ धावाच करू शकला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर मोईन आणि आदिल रशीदने १-१ विकेट मिळवली.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa beat eng by 7 runs in last 3 overs aiden markram catch turning point of south africa win quinton de cock fifty t20 world cup 2024 bdg