SA vs AFG, T20 World Cup 2024 Match Preview: टी-२० विश्वचषक २०२४ मधील पहिली सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. अफगाणिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारत इतिहास रचला. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच आयसीसी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये खेळणार आहे. अफगाणिस्तानचा संघाने टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करत बलाढ्य न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांना पराभूत करत हा मोठा टप्पा त्यांनी गाठला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदाच्या टी-२० विश्वचषकात एकही सामना हरलेला नाही.

SA vs AFG: दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हेड टू हेड

IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra CM Devendra Fadnavis Attends Shaurya Diwas Program In Panipat
…तर देशाचा इतिहास वेगळा असता! पानिपतमध्ये मराठा शौर्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे योद्ध्यांना अभिवादन
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
South Africas sports minister calls for boycott of Afghanistan match in Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : ‘अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाका…’, दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांची मागणी
afganisthan and india meeting
अफगाणी नागरिकांना व्हिसा सुरू करा! तालिबानची भारताकडे मागणी

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यामधील आफ्रिकेने दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचा सामना जिंकणे सोपे नसेल. याशिवाय टी-२० वर्ल्डकप वगळता या उभय संघांमध्ये टी-२० मालिका अथवा सामना झालेला नाही.

हेही वाचा – T20 WC 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा उपांत्य फेरीचे नियम

SA vs AFG: हवामानाचा अंदाज

दक्षिण आफ्रिका वि अफगाणिस्तान सामन्यादरम्यान तापमान २३.५६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि आर्द्रता सुमारे ९१% असेल. तर १.८९ मी/से वेगाने वारे अपेक्षित आहेत. तर संध्याकाळी म्हणजे सामन्याच्या वेळी कोणत्याही प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता नाही.

हेही वाचा – “भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”

SA vs AFG: खेळपट्टीचा अहवाल

ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील खेळपट्टी संतुलित आहे. गेल्या २० सामन्यांमध्ये या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ११७ धावा आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता अधिक आहे कारण या मैदानावर खेळल्या गेलेल्या बहुतेक सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

हेही वाचा- अफगाणिस्तानची प्रगती ‘याचि देही याचि डोळा’ पाहणारा मोहम्मद नबी, जागतिक क्रिकेटमधील अनोखा विक्रमवीर

SA vs AFG: सामन्याची वेळ आणि लाइव्ह

स्थानिक वेळेनुसार, दक्षिण आफ्रिका वि अफगाणिस्तान सामना बुधवार, २६ जून रोजी रात्री ८.३० वाजता खेळवला जाईल. मात्र, भारतीय वेळेनुसार गुरुवारी २७ जून रोजी सकाळी ६ वाजता हा सामना सुरू होईल. सामन्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेक होईल. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान उपांत्य सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाअव्ह पाहता येईल. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल, जे तुम्ही मोबाईलवर ‘विनामूल्य’ पाहू शकता.

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

SA vs AFG: अफगाणिस्तानचा हा खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षण करताना रहमानउल्ला गुरबाजला पहिल्याच षटकातच गुडघ्याला दुखापत झाली आणि त्याने लगेचच मैदान सोडले. यानंतर मोहम्मद इशाक संपूर्ण सामन्यात बदली यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला. जर गुरबाज सेमीफायनल सामना खेळू शकला नाही तर हजरतुल्ला झाझाईला सलामीवीराची संधी मिळू शकते आणि इशाक यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळू शकतो.

हेही वाचा – Afg vs Ban T20 World Cup: रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्डकप सेमी फायनल- अफगाणिस्तान संघाच्या विलक्षण प्रवासाची गोष्ट

SA vs AFG: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

अफगाणिस्तान
इब्राहिम झादरान, रहमानुल्ला गुरबाज, (यष्टीरक्षक)/हजरतुल्ला झाझाई, अजमातुल्ला ओमरझाई, गुलबदिन नईब, मोहम्मद नबी, करीम जनात/मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), रशीद खान (कर्णधार), नंगेलिया खरोटे, नवीन उल हक, नूर अहमद, फजलहक फारुकी

दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नोरखी, तबरेझ शम्सी

Story img Loader