टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील सामना आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जात आहे. हा सामना सिडनीत येथे खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना, ५ गडी गमावून २०५ धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेश संघाला २०६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या सामन्यात रिले रॉसोने या टी-२० विश्वचषकातील पहिले शतक झळकावले.

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात टी-२० विश्वचषकाचा २२ वा सामना खेळला जात आहे. सिडनी येथे होत असलेल्या गट-२ मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिले रॉसोने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५६ चेंडूचा सामना करताना, ७ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने १०९ धावांची दमदार खेळी साकारली. या टी-२० विश्वचषकातील हे पहिले शतक ठरले. त्याचबरोबर रिले रॉसोच्या टी-२० कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. रोसोने सलग दुसऱ्या टी-२०मध्ये शतक झळकावले आहे. त्याने ४ ऑक्टोबर रोजी इंदूर येथे भारताविरुद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या.

डी कॉक आणि रॉसोची १६३ धावांची भागीदारी –

क्विंटन डी कॉक ३८ चेंडूत ६३ धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार मारले. डी कॉकला सौम्या सरकारने अफिफ हुसेनकरवी झेलबाद केले. डी कॉकने रोसोसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८५ चेंडूत १६३ धावांची भागीदारी केली. ट्रिस्टन स्टब्स तिसऱ्या विकेटसाठी बाद झाला. त्याला लिटन दासने शकीब अल हसनकरवी झेलबाद केले. स्टब्सने सात चेंडूंत सात धावा केल्या. तत्पूर्वी, आफ्रिकन संघाला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. कर्णधार टेंबा बावुमा दोन चेंडूत दोन धावा करून बाद झाला. त्याला तस्किन अहमदने यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद केले.

Story img Loader