India won T20 WC 2024 by 7 Runs: भारतीय संघानं तमाम देशवासीयांना शनिवारी रात्री विश्वविजयाचं गिफ्ट दिलं. टी २० वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियानं हातून निसटून चाललेल्या सामन्यात अक्षरश: विजयश्री खेचून आणली. भारतीय संघाच्या या विजयाबद्दल देशभरातून, विविध क्षेत्रातून त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा कॅप्टन कूल माहीनं आपल्या खेळाडूंचं मन भरून कौतुक केलं असताना भारताचा सर्वकालिक महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भारतीय संघासाठी खास पोस्ट त्याच्या एक्स हँडलवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सचिननं त्याच्या ‘मित्रा’ला खास शुभेच्छाही दिल्या आहेत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय आहे पोस्टमध्ये?
सचिन तेंडुलकरनं या पोस्टमध्ये संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. पण त्याचवेळी संघातल्या काही खेळाडूंची त्यानं विशेषकरून नावं घेतली आहेत. त्यात जसा कर्णधार रोहित शर्मा आहे, तसाच भारताच्या अंतिम सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरलेला किंग कोहलीही आहे. त्याचवेळी मालिकावीराचा खिताब पटकावणारा बुम बुम बुमराहदेखील आहे. पण एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करून आपण त्याच्यासाठी खूप खुश आहोत, असं सचिननं म्हटलं आहे. ही विशेष व्यक्ती आणि सचिन जिचा मित्र म्हणून उल्लेख करतोय, ती म्हणजे अर्थात भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि सचिनचा एकेकाळचा टीममेट राहुल द्रविड!
“टीम इंडियाच्या जर्सीवर समाविष्ट होणारा असा प्रत्येक स्टार भारतातील उद्याच्या क्रिकेटपटूंच्या पिढीला त्यांच्या डोळ्यांमधली ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बळ देणारा ठरणार आहे. भारतानं विश्वविजयाचा चौथा स्टार या विजयानं मिळवला आहे. टी २० वर्ल्डकपमधलाभारतासाठीचा दुसरा स्टार”, असं म्हणत सचिन तेंडुलकरनं संपूर्ण टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.
“२०११ ला तू वर्ल्डकप मिस केलास, पण…”
दरम्यान, सचिन तेंडुलकरनं राहुल द्रविड या त्याच्या मित्राचा विशेष उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे. “वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियासाठी जणूकाही एक पूर्ण चक्रच पूर्ण झालं. २००७ साली तिथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील आपल्या पराभवापासून ते काल तिथे टीम इंडियानं साजऱ्या केलेल्या टी २० विश्वचषक २०२४ मधील विजयापर्यंत! माझा मित्र राहुल द्रविडसाठी मी खूप खूश आहे. तू २०११ चा वर्ल्डकप मिस केलास. पण टी २० वर्ल्डकपमधील विजयात तुझं योगदान अमूल्य असं आहे. मी त्याच्यासाठी खूप खूश आहे”, असं सचिननं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रोहित, विराट ते बुमराह!
या पोस्टमध्ये सचिननं भारताच्या दिग्गज त्रिकुटाचंही कौतुक केलं आहे. “मी रोहित शर्माविषयी काय बोलू? जबरदस्त कॅप्टन्सी! २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्डकपमधील पराभव मागे सारून टी २० वर्ल्डकपसाठी आपल्या खेळाडूंना सतत प्रोत्साहन देत राहाणं हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे”, असं सचिननं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांची कामगिरी मालिकावीर आणि सामनावीराच्या पुरस्काराला साजेशी अशीच होती. जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा त्यांनी सर्वोत्तम खेळ केला”, असंही सचिननं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सचिननं काढली ‘क्लास ९६’ ची आठवण!
दरम्यान, यावेळी सचिन तेंडुलकरनं ९६ सालच्या क्रिकेटपटूंच्या बॅचची आठवण काढली. “राहुल द्रविडसोबतच पारस म्हांब्रे आणि विक्रम राठोड यांनीही १९९६ सालीच त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. टीम इंडियानं १९९६ च्या या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादित केलं हे पाहून खूप आनंद होत आहे”, असं सचिननं नमूद केलं आहे.
“ही एक संपूर्णपणे सांघिक कामगिरी आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि बीसीसीआयचे मनापासून आभार!” असंही पोस्टच्या शेवटी सचिननं म्हटलं आहे.