Sreesanth’s reaction to Sanju Samson : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून रद्द झाला असला तरी भारतीय संघाने साखळी टप्प्यातील आपले सर्व सामने जिंकले. मात्र, आता टीम इंडिया सुपर ८ फेरीत पोहोचली आहे. पण सुपर ८ फेरीत भारतीय संघाची कशी असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतला विश्वास आहे की प्लेइंग इलेव्हनमध्ये शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. कारण शिवम दुबेने या स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच षटक टाकले आहे. त्यामुळे श्रीशांतला वाटते की संघाला फक्त शुद्ध फलंदाजाची निवड करायची असेल, तर संघात अष्टपैलू शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट क्लबमध्ये गोलंदाजांना अनुकूल होते, ज्यामुळे फलंदाजांना धावा काढण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला.

दुबेच्या जागी सॅमसनला मिळू शकते संधी –

वेस्ट इंडिजमध्ये भारताला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, तर सॅमसन एका टोकाला खेळपट्टीवर टिकून राहू शकतो, असे श्रीशांतचे मत आहे. फर्स्टपोस्टशी बोलताना श्रीशांत संजू सॅमसनबद्दल म्हणाला, “आपल्याला माहित आहे की शिवम दुबेच्या जागी तो (संजू सॅमसन) मधल्या फळीत खेळी शकतो. जर दुबे फलंदाजी करत नसेल किंवा गोलंदाजी करत नसेल तर मला वाटते की संजू एक उत्तम पर्याय असेल. कारण तो नेहमी परिस्थितीशी जुळवून घेतो आणि परिस्थितीनुसार तो आपला गियर बदलू शकतो.”

हेही वाचा – VIDEO : ‘तो संघात राहण्याच्याही लायक नाही..’, वीरेंद्र सेहवाग टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ‘या’ फलंदाजावर संतापला

रवींद्र जडेजासारख्या फिनिशरबरोबर तो संघाचा डाव सावरु शकतो –

माजी गोलंदाज पुढे म्हणाला, “जेव्हा न्यूयॉर्क किंवा बार्बाडोसमध्ये किंवा कुठेही विकेट महत्त्वाच्या असतात, जर तीन किंवा चार विकेट लवकर गेल्या तर मला वाटते की संजू एक असा खेळाडू आहे. जो अँकरची भूमिका बजावू शकतो आणि हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजासारख्या फिनिशरबरोबर खेळू शकतो आणि संघाचा डाव सावरु शकतो.” मात्र, संघ व्यवस्थापन सध्या शिवम दुबेकडेच राहण्याची शक्यता आहे. अलीकडे, डाव्या हाताच्या फलंदाजाने महत्त्वपूर्ण ३१(३५) धावा करून मेन इन ब्लू संघाला अमेरिकेविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर दुबेची गोलंदाजी करण्याची क्षमताही कॅरेबियन परिस्थितीतही उपयोगी पडू शकते.

हेही वाचा – MPL 2024 : कर्णधारपदानंतर ऋतुराज विकेटच्या मागेही घेणार धोनीची जागा, विकेटकीपिंग करतानाचा VIDEO व्हायरल

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे/ संजू सॅमसन , हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson instead of shivam dube in playing xi sreesanth suggests ahead of ind vs afg t20 wc 2024 super 8 vbm
Show comments