Saurabh Netravalkar send Virat Rohit the way to the tent : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली असा खेळाडू आहे, ज्याच्यासमोर खेळपट्टी आणि घातक गोलंदाज यांचा फारसा फरक पडत नाही. पण २०२४ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीची त्याच्या नावाप्रमाणे तळपताना दिसत नाही. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात विराट १० धावाही करू शकला नाही. दुसरीकडे, रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून स्पर्धेची सुरुवात केली. मात्र अमेरिकेसारख्या लहान संघासमोर दोन्ही दिग्गज निष्प्रभ ठरले. अमेरिकन संघाचा मास्टरमाइंड सॉफ्टवेअर इंजिनिअरने रोहित-विराटला आऊट करण्याचा कोड असा क्रॅक केला की, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आम्ही बोलतोय त्या सौरभ नेत्रावळकरबद्दल ज्याने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्यासमोर गुडघे टेकायला लावले होते. यानंतर आता याच सौरभ नेत्रावळकरने भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे. सौरभ नेत्रावळकरने विराट-रोहितसारख्या दिग्गजांनाही लोटांगण घालायला भाग पाडले. त्याचबरोबर आयसीसी स्पर्धेत विराट कोहलीला गोल्डन डकवर आऊट करणारा सौरभ नेत्रावलकर पहिला गोलंदाज ठरला आहे. यानंतर पुढच्याच षटकात नेत्रावलरने स्फोटक रोहित शर्मालाही आपल्या जाळ्यात अडकवले. अवघ्या १० धावांवर टीम इंडियाने दोन विकेट गमावल्या होत्या.

हेही वाचा – IND v USA: बोरिवलीतील अनेक खेळाडू या सामन्यात असं शास्त्रींनी म्हणताच रोहित शर्मा पाहा काय म्हणाला, “त्यांच्यासोबत एकत्र क्रिकेट…”

हेही वाचा – IND VS USA T20 World Cup: पेनल्टीचा भुर्दंड बसला आणि अमेरिकेने टाकली मान; काय आहे नवीन नियम?

कोण आहेत सौरभ नेत्रावळकर?

अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न घेऊन तो अमेरिकेत स्थायिक झाला. पण नेत्रावळकरांच्या रक्तातील क्रिकेट टॅलेंट त्याला शांत बसू देत नव्हते. म्हणून त्याने अमेरिकेत आपला क्रिकेट जोपासत अमेरिकेच्या संघात मजल मारली. विशेष म्हणजे यापूर्वी तो भारतीय संघासाठी अंडर-१९ चा विश्वचषक खेळला आहे. त्याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.आता तो २०२४ च्या टी-३० विश्वचषकात फलंदाजांसाठी काळ ठरताना दिसत आहे. नेत्रावलकरने पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या प्राणघातक गोलंदाजीने चर्चेत आला.

हेही वाचा – IND vs USA : क्रिकेटच्या पटलावर भारतच महासत्ता; अमेरिकेचं आव्हान पार करत सुपर ८ मध्ये आगेकूच

भारताने अमेरिकेवर ७ विकेट्सनी मात करत सुपर ८ फेरी गाठली –

भारतीय संघाने सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर अमेरिकेचा सात गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषकाच्या अ गटातून सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने २० षटकांत आठ गडी गमावून ११० धावा केल्या.प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावून संघाला सावरले आणि दुसऱ्या टोकाला शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. या दोन फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून १११ धावा करून विजय मिळवला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय असून त्याने सहा गुण घेत सुपर एटमध्ये स्थान निश्चित केले आहे.