Saurabh Netravalkar Singing Marathi Songs Video: टी २० विश्वचषकात २०२४ च्या पर्वात गाजलेलं सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे सौरभ नेत्रावळकर. मराठमोळ्या सौरभने युएएसकडून खेळताना आधी पाकिस्तानची तुफान धुलाई केली. सुपर ओव्हरमध्ये सामना फिरवून पाकिस्तानला सौरभने दिलेला धक्का बाबर आझमच्या संघाला टी २० विश्वचषकातून बाहेर ढकलण्यासाठी खूप मोठं कारण ठरला. भारतासमोर पण सौरभची जादू कायम राहिली. विराट कोहलीला बाद करून सौरभने आपल्या खेळाचं कसब सिद्ध केलं. व्हिजा विरुद्ध आधार कार्ड अशा सामन्याच्या टॅगसह भारत विरुद्ध यूएसए सामना सुद्धा ऑनलाईन चर्चेत राहिला. सौरभच्या क्रिकेटचं कौतुक होत असताना त्याच्या प्रोफेशनल बाजूबद्दल सुद्धा उलगडा झाला होता. सौरभ हा एक इंजिनिअर असून अमेरिकेत ओरॅकल या कंपनीत काम करतो ही माहिती समोर येताच नेटकऱ्यांना त्याच्या कमाल आयुष्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला होता. काम व क्रिकेटचा मेळ साधणाऱ्या सौरभ नेत्रावळकरची अस्सल मराठमोळी बाजू आता नव्याने समोर येत आहे. सौरभने आपल्या युट्युब व इंस्टाग्राम चॅनेलवर शेअर केलेले काही व्हिडीओ त्याच्यातील गायन कौशल्यावर प्रकाश टाकतायत. विशेष म्हणजे ज्या स्पष्टतेने सौरभ मराठी गाणी गातोय ते पाहून तर सगळ्यांनाच आनंद झाला आहे.

सौरभ नेत्रावळकरचा साधारण काही महिन्यांपूर्वी शेअर केलेला ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गाणं गातानाचा व्हिडीओ पाकिस्तानच्या सामन्यानंतर व्हायरल झाला होता. तर आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या चित्रपटातील ‘ढीपाडी ढिपांग’ गाणं गातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. युकलेले वाजवताना सौरभ अगदी सहजतेने हे गाणं गातोय.

Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Saurabh Netrawalkar Statement on Suryakumar Yadav Dropped Catch
IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
USA vs PAK Saurabh Netravalkar LinkedIn Post
पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचं लिंक्डइन पेज पाहून चाहते थक्क; म्हणाले, “यार डिलीट कर, माझे..”
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”

सौरभ नेत्रावळकर नवीन मराठी गाण्याचा Video

इतकंच नाही तर केशवा माधवा…, मन उधाण वाऱ्याचे, राधा ही बावरी ही मराठी गाणी गातानाचे व्हिडीओ सुद्धा सौरभने आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. सौरभ युट्युबवर फार ऍक्टिव्ह नसावा, त्याचे सध्या तरी ८८२ स्बस्क्राइबर्स आहेत. सौरभ नेत्रावळकर हा ट्रेंडमध्ये आल्यापासून त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेकांना त्याच्या खेळाइतकंच त्याने काम व क्रिकेट या पैलूंचा समतोल कसा साधला याविषयी जास्त कुतूहल आहे.

हे ही वाचा<< सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”

दरम्यान या व्हिडीओखाली सौरभच्या चाहत्यांनी कमेंट करून त्याच्या या आयुष्याचा खूप हेवा वाटतो असे म्हणत कमेंट्स केल्या आहेत. मला रात्री ३ वाजता जे जे आयुष्यात साध्य करावंसं वाटतं ते सगळं तू खरोखरच मिळवलंय अशी एका युजरने कमेंट केली होती. अनेकांनी गमतीत कमेंट करत “तू पाकिस्तानला गुडघे टेकायला लावलेस त्यासाठी अभिनंदन पण आपल्याच लोकांबाबत जरा हळू खेळ, प्लीज” असंही म्हटलं आहे. सौरभचा हा गाणी गातानाचा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा.