Saurabh Netravalkar sister reveals He Works From Hotel After T20 World Cup Matches: सौरभ नेत्रावळकर हे नाव सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकामध्ये गाजत आहे. सौरभ नेत्रावळकरने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने लक्ष वेधले आहे. मुंबईत जन्मलेल्या सौरभ हा एक सॉफ्टवेअर इंजिनीयर असून वेगवान गोलंदाजही आहे. भारत वि अमेरिकेच्या सामन्यात सौरभने विराट कोहली आणि रोहित शर्मा या मोठ्या खेळाडूंना बाद करत तीन सामन्यांमध्ये चार विकेट आपल्या नावे केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सध्या क्रिकेटप्रेमी तसेच क्रीडा समीक्षकही त्याचे कौतुक करताना दिसत आहे. अमेरिकेकडून क्रिकेट खेळत असला तरी सौरभ अजूनही इंजीनियर म्हणून कार्यरत आहे. मग सामन्यांच्या वेळेला तो काम कसं मॅनेज करतो, याबद्दल त्याच्या बहिणीने माहिती दिली.
विराट आणि रोहितच्या विकेटपेक्षाही सर्वाधिक प्रशंसा त्याची पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे झाली. सौरभने सुपर ओव्हरमध्ये १८ धावांचा बचाव करत अमेरिकेला त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. २००९ चे जेतेपद पटकावलेला पाकिस्तानचा संघ नवख्या अमेरिकेकडून पराभूत झाला.
अमेरिकेत ओरॅकल कंपनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि क्रिकेटपटू अशा दुहेरी भूमिकांचा समतोल साधत नेत्रावळकर कामगिरी करताना दिसत आहे. त्याची बहीण, निधी, हिने सौरभ या दोन्ही भूमिका तो कसा सांभाळतो याबाबत सांगितले.
“तो खूप भाग्यवान आहे की त्याच्या कारकिर्दीत त्याला नेहमीच साथ देणारे लोक भेटले. त्याला माहित आहे की जेव्हा तो क्रिकेट खेळत नाही तेव्हा त्याला त्याची नोकरी १०० टक्के मेहनत घेऊन करायची आहे. त्यामुळे तो जिथे जातो तिथे तो त्याचा लॅपटोपा घेऊन जातो आणि त्याला कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे,” असे निधीने क्रिकेट नेक्स्टला सांगितले.
निधीचा भाऊ त्याच्या व्यावसायिक आणि क्रिकेटमधील जबाबदाऱ्या कशा अखंडपणे पार पाडतो, हेही तिने सांगितले. ती पुढे म्हणाली, “जेव्हा तो भारतात येतो तेव्हाही तो त्याचा लॅपटॉप घेऊन येतो, तो काम करत असतो. मॅच झाल्यावर हॉटेलमध्ये पण तो त्याचे काम करतो. त्याच्या कामाप्रतिचे त्याचं समर्पण कौतुकास्पद आहे.”
सौरभ पूर्णवेळ इंजिनीयर आणि अर्धवेळ क्रिकेटपटू यांच्यात समतोल साधत असतो. इतकेच नव्हे तर त्याच्या या कामात त्याची कंपनीही त्याला तितकाच पाठिंबा देते. “तो एक मुंबईकरनेस त्याच्यामध्ये आहे. जो नेहमीच असतो; जी संपूर्ण घाईघाईची संस्कृती आपल्या सर्वांमध्येच आहे,” ती पुढे म्हणाली.
Is it workplace toxicity?
— Amit Misra (@amit6060) June 14, 2024
Success isn't just about how much we carry; it's also about what we leave behind to make space for growth.
सौरभ नेत्रावळकरच्या बहिणीने टी-२० विश्वचषकादरम्यान तो हॉटेलमधून काम करत असल्याचा खुलासा केल्यानंतर नेटिझन्सनी आयटी कंपनी ओरॅकलला त्यांच्या ‘टॉक्सिक वातावरण’ आणि स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सुट्टी न दिल्याबद्दल सुनावले आहे. तर, इतरांनी कार्यालयीन काम आणि क्रिकेटमध्ये समतोल साधण्यासाठी त्याचे कौतुकही केले. सोशल मीडियावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
yeh toh toxic work culture nikla @oracle ? pic.twitter.com/42G64BZyCt
— Trendulkar (@Trendulkar) June 14, 2024
आज म्हणजेच १४ जूनला फ्लोरिडामध्ये होणाऱ्या अमेरिका वि आयर्लंड सामन्यात सौरभ नेत्रावळकर खेळताना दिसणार आहे. हा सामना जिंकत अ गटातून सुपर८ साठी पात्र होण्याची सुवर्णसंधी अमेरिकेकडे आहे.