Saurabh Netravalkar Exclusive: टी २० विश्वचषकात अमेरिकेच्या चमूतील हुकुमी एक्का म्हणून समोर आलेला मुंबईकर सौरभ नेत्रावळकर सोशल मीडिया पासून ते ट्रेन, बसमध्ये होणाऱ्या चर्चांपर्यंत सर्वत्र सध्या ‘महत्त्वाचा मुद्दा’ ठरतोय. अमेरिकेने विश्वचषकात आता सुपर ८ चा गड सर केल्यावर सौरभने आपल्या कंपनीत कॉल करून मॅनेजरकडे “मी आता अजून एक आठवडा काही कामावर येत नाही” असं सांगून टाकलंय. ऑनलाईन चर्चांमुळे कदाचित आपल्यालाही माहित असेलच की सौरभ हा अमेरिकेन कंपनी ओरॅकल मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. नेत्रावळकर ‘वाइल्डकार्ड सर्चिंग’ या टेक्नॉलॉजीवर काम करतो. अलीकडेच इंडियन एक्सस्प्रेससह खास बातचीत करताना सौरभने क्रिकेट व काम दोन्ही कसं सांभाळतो, विश्वचषकाच्या वेळी कंपनीकडून कशी मदत होतेय याविषयी खुलासे केले. काही दिवसांपूर्वी सौरभच्या बहिणीने सौरभ मॅचच्या वेळी लॅपटॉप घेऊन जातो आणि मॅच संपल्यावर हॉटेलमध्ये काम करतो असे सांगितल्यावर नेटकऱ्यांनी ओरॅकल कंपनीवरच ताशेरे ओढले होते पण सौरभने इंडियन एक्सस्प्रेससह बोलताना दिलेल्या उत्तरावर दोन्ही बाजू स्पष्ट झाल्या आहेत.

सौरभ नेत्रावळकर काम व क्रिकेट कसं सांभाळतो?

सौरभ नेत्रावळकर हा ट्रेंडमध्ये आल्यापासून त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेकांना त्याच्या खेळाइतकंच त्याने काम व क्रिकेट या पैलूंचा समतोल कसा साधला याविषयी जास्त कुतूहल आहे. या संतुलनाविषयी सांगताना सौरभ म्हणतो की, “आम्ही (सुपर आठसाठी) पात्र झाल्यानंतर, मी माझ्या कंपनीत मॅनेजरला लगेच कळवले की मी आणखी काही काळ रजेवर आहे. आता माझं संपूर्ण ऑफिस माझा खेळ पाहत आहे, सर्वांनी खूप पाठिंबा दिला आहे.”

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

“आम्ही कंपन्यांचा डेटा संग्रहित करून सर्च इंजिन जलद काम करेल याची खात्री करतो. सुदैवाने, मी खेळत असताना कोणतीही SOS आली नाही. यापूर्वी कधीतरी मला मॅचच्या वेळी कॉल आल्याचे एक दोन प्रसंग घडले होते. अन्यथा, माझी टीम सगळं काही नीट व्यवस्थापित करतते. आता तर वर्ल्डकप असल्याने मी काय करतोय हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे मला फार कुणी त्रास देत नाही.”

“हो आता, प्रत्येक प्रोजेक्टला एक डेडलाइन असते त्यामुळे दबाव असतो, म्हणून मी रात्री काही वेळा काम केलं आहे. मला माझं क्रिकेटचं वेळापत्रक माहीत आहे, त्यामुळे मी माझ्या मॅनेजरसह त्यानुसार नियोजन करतो. मी विश्वचषक स्पर्धेसाठी यूएसएमध्ये सामील होण्यापूर्वी माझे काम पूर्ण केले होते.”

हे ही वाचा<< सौरभ नेत्रावळकरचे मराठी सूर; ‘मन उधाण वाऱ्याचे’ गाण्यानं घातली सर्वांना भुरळ! म्हणाले, “असं काय आहे जे तुला येत नाही?”

मुंबईत जन्मलेला डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर हा यूएसए लाईन-अपमधील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे ज्याने पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामन्यात बाजी पालटण्याचे काम केले. याच मॅचमध्ये निर्णायक सुपर ओव्हर टाकल्यावर सौरभ सर्वाधिक चर्चेत आला, त्यापाठोपाठ भारताविरुद्ध सामन्यात विराट कोहली, रोहित शर्माची विकेट घेत सौरभने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले.