Saurabh Netravalkar Exclusive: टी २० विश्वचषकात अमेरिकेच्या चमूतील हुकुमी एक्का म्हणून समोर आलेला मुंबईकर सौरभ नेत्रावळकर सोशल मीडिया पासून ते ट्रेन, बसमध्ये होणाऱ्या चर्चांपर्यंत सर्वत्र सध्या ‘महत्त्वाचा मुद्दा’ ठरतोय. अमेरिकेने विश्वचषकात आता सुपर ८ चा गड सर केल्यावर सौरभने आपल्या कंपनीत कॉल करून मॅनेजरकडे “मी आता अजून एक आठवडा काही कामावर येत नाही” असं सांगून टाकलंय. ऑनलाईन चर्चांमुळे कदाचित आपल्यालाही माहित असेलच की सौरभ हा अमेरिकेन कंपनी ओरॅकल मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. नेत्रावळकर ‘वाइल्डकार्ड सर्चिंग’ या टेक्नॉलॉजीवर काम करतो. अलीकडेच इंडियन एक्सस्प्रेससह खास बातचीत करताना सौरभने क्रिकेट व काम दोन्ही कसं सांभाळतो, विश्वचषकाच्या वेळी कंपनीकडून कशी मदत होतेय याविषयी खुलासे केले. काही दिवसांपूर्वी सौरभच्या बहिणीने सौरभ मॅचच्या वेळी लॅपटॉप घेऊन जातो आणि मॅच संपल्यावर हॉटेलमध्ये काम करतो असे सांगितल्यावर नेटकऱ्यांनी ओरॅकल कंपनीवरच ताशेरे ओढले होते पण सौरभने इंडियन एक्सस्प्रेससह बोलताना दिलेल्या उत्तरावर दोन्ही बाजू स्पष्ट झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा