Saurabh Netravalkar Thanks Oracle With Post: अमेरिका क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मराठमोळा सौरभ नेत्रावळकरने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेत्रावळकर हा पूर्ण वेळ क्रिकेटपटू नसून तो ओरॅकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. मूळचा मुंबईचा असलेल्या सौरभने इंजिनीयर म्हणून करियर साकारताना एक अप्रतिम क्रिकेटर म्हणून क्रिकेट विश्वात आपले नाव कमावले. सौरभने आता ओरॅकल कंपनीने त्याला क्रिकेट खेळण्याची मुभा दिल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्याने ओरॅकल कंपनीचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात अमेरिका क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून नेत्रावळकरने आपला दबदबा तयार केला आहे,. सौरभच्या या कामगिरीमुळे त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तीन वर्ल्डकप सामन्यांमध्ये नेत्रावळकरने प्रभावी गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात भारत-अमेरिका सामन्यातील पहिल्या चेंडूवर गोल्डन डक झालेला भारतीय फलंदाज विराट कोहली आणि रोहित या सर्वात उल्लेखनीय विकेट आहेत. या कामगिरीने त्याला चांगली ओळख मिळाली आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: ‘हे तर टॉक्सिक वातावरण’, काम आणि क्रिकेट यामध्ये कसरत करणाऱ्या सौरभ नेत्रावळकरच्या कंपनीवर नेटीझन्सची टीका

अमेरिकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात नेत्रावळकरच्या दमदार कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. दबावाखाली असतानाही त्याने कौशल्य आणि संयमाच्या जोरावर संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात सुपर ओव्हर मध्ये, त्याने १८ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला आणि त्याच्या संघाला माजी चॅम्पियन्सवर आश्चर्यकारक विजय मिळवून दिला.

हेही वाचा – गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

नेत्रावळकरची क्रिकेट क्षेत्रासोबत एक सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून ओळख आहे. ओरॅकलमध्ये एक इंजिनीयर म्हणून तो आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. व्यावसायिक करिअर आणि क्रिकेट यातील समतोल राखण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. यामध्ये त्याच्या कंपनीचाही मोठा वाटा आहे. सौरभच्या बहिणीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सौरभ नेहमी त्याचा लॅपटॉप सोबत घेऊन फिरतो. वर्ल्डकप सामन्यानंतर तो हॉटेलमध्ये काम करतो हेही तिने सांगितले. यानंतर चाहत्यांनी ओरॅकलमध्ये टॉक्सिक वातावरण असल्याचे म्हणत कंपनीवर टीका केली. आता याचदरम्यान सौरभने मात्र त्याच्या कंपनीचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं

नेत्रावळकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्याच्या कंपनीचे आभार मानले आणि म्हणाला, “माझ्या टेक कारकिर्दीबरोबरच माझी आवड जोपासण्यासाठी मला सक्षम करण्यात दिलेल्या पाठिंब्याबद्दल ओरॅकलचे खूप खूप आभार!”

ओरॅकलने अमेरिकेचा संघ सुपर८ मध्ये पोहोचल्यानंतर संघाचे आणि सौरभचे कौतुक करण्यासाठी शेअर केलेल्या पोस्टला रिपोस्ट करत सौरभने कंपनीचे आभार मानले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurabh netravalkar thanks oracle company to allow him pursuing cricket with enginnering t20 world cup 2024 bdg