पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा आणि इंग्लंडने भारताचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा खतरनाक वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने इंग्लिश फलंदाजांना आव्हान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफ्रिदीने सामन्याच्या दोन दिवस आधी सांगितले आहे की, इंग्लंडच्या फलंदाजांसाठी त्याच्याविरुद्ध धावा करणे सोपे जाणार नाही. आफ्रिदीने दुखापतीतून पुनरागमन केले आहे. पहिले दोन सामने त्याच्यासाठी चांगले नव्हते. आफ्रिदीने भारताविरुद्ध ३४ आणि झिम्बाब्वेविरुद्ध २९ धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. लोक त्याच्या फिटनेसवर शंका घेऊ लागले होते. परंतु आफ्रिदीने पुन्हा दमदार पुनरागमन करत टीकाकारांना शांत केले.

त्याने नेदरलँडविरुद्ध एक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन, बांगलादेशविरुद्ध चार आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन बळी घेतले. आफ्रिदीने टी-२० विश्वचषकात गेल्या चार सामन्यांमध्ये १० विकेट घेत खळबळ उडवून दिली होती. त्यांचा संघ एकवेळ बाहेर होणार होता, पण नेदरलँड्सने आफ्रिकन संघाचा पराभव केल्याने पाकिस्तानला जीवदान मिळाले. त्यानंतर पाकिस्ताने बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

हेही वाचा – IREW vs PAKW T20: आयर्लंडचा पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय; ओरला प्रेंडरगास्टची अष्टपैलू कामगिरी

मेलबर्नमध्ये ३० वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तान आणि इंग्लंड संघ आमनेसामने येणार आहेत. शेवटच्या वेळी १९९२ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने इंग्लंडला हरवून विश्वचषक जिंकला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी इंग्लंडचा संघ मेलबर्नमध्ये उतरणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaheen afridi challenges england batsmen says scoring runs against me will not be easy in pak vs eng final vbm
Show comments