Suryakumar Yadav Catch Controversy: भारतीय क्रिकेट संघाने अथक प्रयत्नांनंतर आणि उत्कृष्ट कामगिरीसह टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने ७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. अंतिम फेरीत सूर्यकुमार यादवने टिपलेल्या जबरदस्त झेलने सामना भारताच्या बाजूने फिरवला. सूर्याच्या या कॅचची सगळीकडेच प्रशंसा होत आहे, पण काही जण या कॅचवर प्रश्नचिन्हही उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावरील काही व्हिडिओ आणि नियमांचा हवाला देत सूर्याच्या पायाने सीमारेषेला स्पर्श केल्याचे म्हटले जात आहे. पण आता यावर समालोचक आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू शॉन पोलॉक यांनी वक्तव्य दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

सूर्याच्या या कमाल कॅचचे वेगवेगळे अँगल व्हायरल होत आहेत. यामध्ये सूर्या कॅच घेत असताना बाऊंड्री कुशन मागे ढकलली गेली हे दाखवले जात आहेत. आयसीसीच्या प्लेईंग कंडीशननुसार, ती बाऊंड्रीची कुशन आहे, पांढरी रेषा नाही, ती पांढरी रेषा सीमा म्हणून ग्राह्य धरली जाते. कलम १९.३ नुसार: “सीमारेषा चिन्हांकित करण्यासाठी वापरली जाणारी एखादी वस्तू कोणत्याही कारणास्तव हलली तरी सीमारेषा ही तिच्या मूळ स्थितीत असल्याचे मानले जाईल.”

कलम १९.३.२ नुसार, “सीमा चिन्हांकित करण्यासाठी वापरली जाणारी वस्तू कोणत्याही कारणामुळे जर हलली, ती वस्तू शक्य तितक्या लवकर त्याच्या मूळ स्थितीत परत आणली जाईल; जर सामना सुरू असेल, तर लगेच डेड बॉल घोषित केले जाईल.”

हेही वाचा – IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

शॉन पोलॉक यांनी या कॅचबाबत सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आणि त्याच्या प्रयत्नांसाठी तसेच यशस्वी कॅचसाठी सूर्यकुमारचे कौतुक केले. शॉन पोलॉकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलॉक म्हणाले- “कॅच नियमानुसार होता. बाऊंड्री कुशन हलली होती, पण खेळादरम्यानच हे घडते. त्याचा सूर्याशी काहीही संबंध नव्हता. तो कुशनवर उभा नव्हता. याबरोबरंच पोलॉक यांनी सूर्याच्या सीमारेषेनजीक प्रसंगावधान राखून झेल टिपण्याच्या कौशल्याचं कौतुक केलं. भारताच्या विजयानंतर सूर्यकुमारला ड्रेसिंग रूममध्ये बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडून ‘बेस्ट फिल्डर’ मेडल मिळाले. वनडे वर्ल्डकपपासून हे मेडल देण्याची प्रथा भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये सुरू झाली.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaun pollock statement on suryakumar yadav catch in t20 wc final said cushion had moved watch video ind vs sa bdg
First published on: 01-07-2024 at 18:43 IST