USA vs PAK Highlights, T20 World Cup 2024: आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ च्या या स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी विजय मिळवला. अमेरिकेने पाकिस्तानला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये १९ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला एक विकेट गमावून अवघ्या १३ धावाच करता आल्या. अमेरिकेने अशा पद्धतीने या स्पर्धेतला दुसरा सामना जिंकला. अमेरिकेच्या विजयानंतर सोशल मीडियावर त्यांचं अभिनंदन केलं जातं आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओ पोस्ट करत पाकिस्तानची लाज काढली आहे.

सुपर ओव्हरचा थरार कसा होता?

अमेरिकेने दिलेल्या १९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानच्या टीममधले इफ्तिखास अहमद आणि फखर जमान हे दोघेही मैदानात आले. तर अमेरिकेने मराठमोळा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरला सुपर ओव्हरची बॉलिंग दिली. सौरभने पहिला बॉल डॉट टाकला. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. सौरभने त्यानंतर वाईड बॉल टाकला. पाकिस्तानला हे वाटत होतं की त्यांच्या धावा होतील. पण सौरभने तिसरा बॉल फेकला तेव्हा इफ्तिकार अहमदचा कॅच नितीश कुमारने सहज घेतला. नितीशने अप्रतिम झेल घेतल्याने इफ्तिकार आऊट झाला. ज्यानंतर शादाब खान मैदानात आला.

Babar Azam Resigns as Pakistan White ball team Captain by Social Media Post PCB
Babar Azam: “आता वेळ आली आहे की…,” बाबर आझमने मध्यरात्री अचानक कर्णधारपदाचा दिला राजीनामा, वर्षभरात दुसऱ्यांदा सोडली कॅप्टन्सी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Pakistan test captain Shan Masood on Virat Kohli
VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
IND vs PAK Mudassar Nazar says match-fixing incident cannot be repaired.
‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
Pat Cummins on Rishabh Pant ahead of Border Gavaskar Trophy 2024
विराट-रोहित नव्हे तर ‘या’ भारतीय खेळाडूची ऑस्ट्रेलियाला धास्ती; पॅट कमिन्स म्हणाला, “त्याला रोखावे लागेल नाही तर…”
IND vs BAN Basit Ali Slams PCB After India beat Bangladesh in Chennai Test
IND vs BAN : “वो जाहिल लोग है, उनको…”, भारताच्या विजयानंतर बासित अलीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फटकारले
Sunil Gavaskar Statement on IND vs BAN Test He Warns India Ahead Of 2 match Series
IND vs BAN: “अन्यथा भारताचीही पाकिस्तानसारखी स्थिती होऊ शकते…”, सुनील गावसकरांचा मालिकेपूर्वी टीम इंडियाला इशारा
Younis Khan Statement on Babar Azam and Virat Kohli slams Pakistan Captain for Poor Performance
Younis Khan: “खेळण्यापेक्षा बडबडच जास्त…”, बाबर आझमला सुनावताना पाकिस्तानच्या युनूस खानने विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य

हे पण वाचा- USA vs PAK: बाबर आझमने पाकिस्तानच्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं?

शादाब खान आल्यानंतर काय घडलं?

शादाब खान मैदानात आल्यानंतर पाकिस्तानला ३ चेंडूंमध्ये १४ धावांची गरज होती. सौरभने आणखी एक वाईड टाकल्याने ती १३ धावा विजयासाठी हव्या होत्या. अशातच सौरभच्या चौथ्या चेंडूवर पाकिस्तानने चौकार लगावला. ज्यानंतर २ चेंडूंमध्ये ९ धावा हव्या होत्या. सौरभने पाचव्या चेंडूवर दोन धावा दिल्या. ज्यानंतर एका चेंडूत पाकिस्तानला ७ धावांची गरज होती. सौरभने शेवटचा चेंडू सगळं कौशल्य पणाला लावत फेकला आणि अवघी एक धाव दिली. ज्यानंतर अमेरिकेने इतिहास रचला.

शोएब अख्तरने व्हिडीओत काय म्हटलं आहे?

पाकिस्तानचा पराभव अत्यंत निराशाजनक आहे. अमेरिकेने हरवल्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धेत आमची सुरुवात काही चांगली झाली नाही. पाकिस्तानने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. असाच पराभव १९९९ मध्ये बांगलादेशाच्या विरोधातही झाला होता. पाकिस्तान कधी विजयाचा दावेदारच नव्हता. पाकिस्तानविरोधात अमेरिकेने उत्तम खेळ केला. ते कमांडिग पवित्र्यात राहिले. शाहीन, आमिर यांनी प्रयत्न केला पण काहीही होऊ शकलं नाही. असं म्हणत शोएबने अक्षरशः पराभूत झालेल्या पाकिस्तानची लाज काढली आहे.