Shoaib Akhtar vs Mohammad Shami: टी २० विश्वचषकात भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्याने अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान लढत बघण्याचं अनेकांचं स्वप्न अर्धवट राहिलं पण आता त्याची कसर ट्विटर भरून निघत आहे. टी २० विश्वचषकाच्या अंतिम महासामन्यात जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने बाबर आझम अँड कंपनीचा अगदी अटीतटीच्या सामन्यात ५ गडी राखून पराभव केला, यानंतर दुःखी व नाराज पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, चाहते विरुद्ध भारतीय फॅन्स यांच्यात ट्वीट वॉर सुरु झाले आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर जेव्हा शोएब अख्तरने जेव्हा हार्ट ब्रेक ईमोजी पोस्ट केला होता त्यावरून भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने चिमटा घेत हे तुमच्या कर्माचं फळ आहे असं म्हणत ट्वीट केलं होतं. आता मोहम्मद शमीच्या या ट्विटवरून अन्य पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूंनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा