India Batting Vikram Rathour Statement on Shubman Gill Released: टी-२० विश्वचषक २०२४ च्या भारताच्या अखेरच्या गट सामन्यापूर्वी एका रिपाेर्टमध्ये समोर आलं की सुपर८ फेरी सुरू होण्यापूर्वी शुबमन गिल आणि आवेश खान हे राखीव खेळाडू मायदेशी परततील. मात्र, यानंतर आणखी एक अहवाल समोर आला ज्यामध्ये गिलला शिस्तभंग केल्यामुळे संघातून रिलीज केले जात असल्याचा दावा करण्यात आला होता आणि रोहित शर्मासोबत त्याचे बिनसले होते. शुबमन गिलने रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केले आहे. पण आता या सर्व बातम्यांना पूर्णविराम देत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दोन भारतीय खेळाडूंच्या मायदेशी परतण्याचा निर्णय स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घेण्यात आल्याचे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ खेळाडूंच्या संघाशिवाय बीसीसीआयने टी-२० विश्वचषकासाठी ४ राखीव खेळाडूंची निवड केली होती. शुबमन गिल आणि आवेश खान यांच्याशिवाय रिंकू सिंग आणि खलील अहमद हे राखीव खेळाडू होते. रिंकू आणि खलील आता सुपर८ साठी टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजला रवाना होतील, तर गिल-आवेश मायदेशी परततील.

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

शुबमन गिलला अचानक मायदेशी का पाठवणार?

भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत विक्रम राठोड म्हणाले, “सुरुवातीपासूनच ही योजना होती. जेव्हा आम्ही अमेरिकेत येऊ तेव्हा चार (राखीव) खेळाडू सोबत येतील. त्यानंतर दोघे मायदेशी परततील आणि दोन जण आमच्यासोबत वेस्ट इंडिजला जातील, त्यामुळे संघाची निवड झाल्यापासूनच ही योजना होती.”

हेही वाचा – गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

भारत वि कॅनडामधील सामना रद्द झाला याबद्दल सांगताना राठोड पुढे म्हणाले, “काही राखीव खेळाडूंना रिलीज करण्यात येत आहे. अर्थात, जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी आदर्श नसलेल्या परिस्थितीत खेळता तेव्हा ही चिंता नेहमीच असते. त्यामुळे अशा परिस्थितीत सामना खेळवायचा की नाही हा निर्णय सामना अधिकाऱ्यांवर सोडला जातो. याबाबत संघ म्हणून आम्ही काही बोलू शकत नाही. पण सामना खेळवला गेला असता आम्हाला खरोखरच मदत झाली असती, आम्ही हा सामना खेळण्यास उत्सुक होतो.

जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत खेळता, तेव्हा काही दुखापत होण्याची भीती नेहमीच असते. तुम्ही आधीच सुपर८ मध्ये आहात आणि तुम्हाला दुखापतींचा धोका पत्करायचा नसतो.,” असे फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले.