टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. पर्थच्या मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये पाकिस्तानला अवघ्या एका धावेने पराभूत करुन झिम्बाब्वेने ऐतिहिसिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे सिकंदर रझाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे झिम्बाब्वेला पाकिस्तानवर विजय मिळवता आला तो सिकंदर रझा हा मूळचा पाकिस्तानी आहे. कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार पटकावणारा झिम्बाब्वेचा सिकंदर रझा हा पाकिस्तानी असून तो २०२२ पासून झिम्बाब्वेमध्ये वास्तव्यास आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..

सिकंदरने आजच्या सामन्यामध्ये चार षटकांमध्ये अवघ्या २५ धावा देत तीन महत्त्वाचे गडी बाद केले. केवळ १३० धावा फलकावर असतानाही झिम्बाब्वेच्या संघाला हा विजय मिळवून देण्यात हे योगदान मोलाचं ठरलं. शादाब खान आणि हैदर अली या दोघांना सिकंदरने एकाच षटकात गुंडाळल्याने पाकिस्तानवरील धावगती सुरळीत ठेवण्यासाठीचा दबाव वाढला आणि नंतर त्यामधूनच पुढे आणखीन पडझड होत पाकिस्तान अगदी शेवटच्या चेंडूवर एका धावेने पराभूत झाला. सिंकदरने या वर्षातील आपला सातवा सामनावीर पुरस्कार जिंकला. या बाबतीतही त्याने भारताचा इन फॉर्म फलंदाज विराट कोहलीला मागे टाकलं.

नक्की वाचा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन

सिकंदरचा रझाचं पूर्ण नावं सिकंदर रझा भट असं आहे. त्याचा जन्म २४ एप्रिल १९८६ रोजी झाला. म्हणजेच त्याचा आणि भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये सिकंदरचा झाला आहे. २००२ पासून तो त्याच्या कुटुंबासहीत झिम्बाब्वेमध्ये राहतो. पाकिस्तानी असल्याने त्या आधीपासूनच क्रिकेटची आवड होती. त्यामुळे तो करियरच्या सुरुवातीलाच झिम्बाबेमधील घरगुती क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावारुपास आला. याच वेळी निवड समितीच्या लोकांची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात झाली. त्याच्याकडे झिम्बाब्वेचं नागरिकत्व नसल्याने त्याला खेळाच्या निमित्ताने त्या देशाचं नागरिकत्व देण्यात आलं.

नक्की वाचा >> Video: २५ बॉलमध्ये ५१ धावा अन् तो षटकार…; शेवटच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने काय केलं पाहिलं का?

या विश्वचषक स्पर्धेमध्ये सिकंदरने ५ सामन्यांमध्ये १४५ धावा केल्या आहेत. १४९ च्या सरासरीने त्याने या धावा केल्या असून फिरकी गोलंदाजीच्या जोरावर आठ गडीही बाद केले आहेत. त्याला तीन वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

Story img Loader