टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३९ वा सामना आज इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात पार पडणार आहे. हा सामना सिडनी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यांची नाणेफेक पार पडली आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला दुपारी १:३० वाजता सुरुवात होईल. इंग्लंड संघाच्या दृष्टीने हा सामना खुप मह्त्वाचा आहे.

या सामन्याच्या निकालावर गट-१ मधून उपांत्य फेरी गाठणारा दुसरा संघ निश्चित होणार आहे. इंग्लंडने विजय मिळवल्यास ते उपांत्य फेरीत स्थान मिळवतील, तर श्रीलंकेला सामना जिंकण्यात यश आल्यास ऑस्ट्रेलिया आगेकूच करण्यात मदत होणार आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

इंग्लंडला कर्णधार जोस बटलर, अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान आणि लियाम लििव्हगस्टोन यांच्याकडून फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, तर गोलंदाजीची धुरा मार्क वूड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन सांभाळतील. श्रीलंकेला या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास वानिंदू हसरंगा आणि धनंजय डिसिल्वा यांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाचे भवितव्य श्रीलंकेच्या हातात! ; उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला विजय अनिवार्य

उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला विजय अनिवार्य आहे. श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी त्यांनी उलटफेर केल्यास ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत स्थान मिळेल. तसेच सामना पावसामुळे रद्द झाला, तरी इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर जाईल. ऑस्ट्रेलियाच्या (-०.१७३) तुलनेत इंग्लंडची (०.५४७) निव्वळ धावगती सरस आहे. मात्र, इंग्लंडचा पराभव झाल्यास निव्वळ धावगतीला महत्त्वच राहणार नाही.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर (कर्णधार,यष्टीरक्षक), अॅलेक्स हेल्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, सॅम करन, डेविड मलान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद आणि मार्क वुड.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षाना, लाहिरू कुमारा, कसून राजीता