SA vs AFG Highlights: दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आफ्रिकन संघाने प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ अवघ्या ५६ धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेने या छोट्या लक्ष्याचा सहज पाठलाग करत अवघ्या ८.५ षटकांत विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच खेळणार टी-२० वर्ल्डकप फायनल

दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने २९ धावा केल्या. तर कर्णधार एडन मारक्रमने २३ धावा केल्या. हे दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत नाबाद राहिले. आफ्रिकन संघाने अवघ्या ८.५ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला. संघाची सुरुवात तशी खराब झाली पण धावसंख्या कमी असल्याने दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागला. क्विंटन डी कॉक अवघ्या ५ धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्याला फजलहक फारुकीने बाद केले.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

हेही वाचा – IND v ENG: “डोकं वापरणंही गरजेचं…”, इंझमाम उल हकच्या बॉल टेंपरिंगच्या आरोपावर रोहित शर्मा वैतागला, म्हणाला; “आम्ही काय…”

हेही वाचा: T20 WC 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा उपांत्य फेरीचे नियम

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अफगाणिस्तानचे फलंदाज कमालीचे फ्लॉप ठरले आणि कोणत्याही खेळाडूला संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाही. फक्त अजमतुल्ला उमरझाईला दुहेरी आकडा गाठता आला. या सामन्यात त्याने १० धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज, नूर अहमद आणि मोहम्मद नबी यांना खातेही उघडता आले नाही. मार्को यान्सनने पहिल्याच षटकात अफगाणिस्तानला धक्का देत गुरबाजला बाद केले. तर यान्सनने त्याच्या स्पेलमधील पुढच्या षटकात गुलबदीनला माघारी धाडले. पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने दोन विकेट्स घेत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. त्याने पहिल्या चेंडूवर इब्राहिम झादरानला क्लीन बोल्ड केले. चौथ्या चेंडूवर त्याने मोहम्मद नबीलाही बोल्ड केले. मार्को यानसेनने खरोटोला माघारी धाडलं. तर एनरिक नॉर्खियानेही आपल्या पहिल्याच षटकात यश मिळवले. तबरेझ शम्सीनेही पहिल्याच षटकात दोन विकेट घेतले. त्याने करीम जनात आणि नूर अहमद यांना पायचीत केले. नॉर्खियाने रशीद खानला बोल्ड केले. नवीन उल हक शम्सीचा बळी ठरला अन् अफगाणिस्तान ५६ धावांवर ऑल आऊट झाला.

हेही वाचा – “भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मार्को यान्सने ३ षटकांत १६ धावा देत ३ विकेट घेतले. तबरेज शम्सीनेही तीन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खियाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. या गोलंदाजांमुळेच अफगाण संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि सर्व फलंदाज झटपट माघारी परतले.

आज संध्याकाळी भारत आणि इंग्लंड दुसऱ्या उपांत्य फेरीत भिडणार आहेत. या सामन्यातील विजयी संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम सामना खेळेल. हा अंतिम सामना २९ जूनला बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल.

Story img Loader