USA vs SA Match Highlights: भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरीस अमेरिकेवर विजय मिळवलाच. विस्फोटक फलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी या तिन्ही विभागातील शानदार कामगिरीसह अमेरिकेने आफ्रिकेला सहज विजय मिळवू दिला नाही. हरमीत सिंग आणि अँड्रयू गोसच्या भागीदारीने आफ्रिकेला घाम फोडला पण संघाने अखेरीस १८ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डीकॉकच्या ७४ धावा आणि मारक्रमच्या ४६ धावांसह ४ बाद १९४ धावांचा डोंगर उभारला. अमेरिकेने कडवी झुंज देत या लक्ष्याचा पाठलाग करताना ६ बाद १७६ धावा करू शकले.

अँड्रियस गौसने विस्फोटक फलंदाजी करत संघासाठी ४७ चेंडूत ५षटकार आणि ५ चौकारांसह ८० धावांची खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर आणि हरमीत सिंगच्या विकेटनंतर सामना पलटला आणि अमेरिकेला पराभव पत्करावा लागला. धावांचा पाठलाग करताना अमेरिकेच्या सर्वच फलंदाजांनी पुन्हा एकदा मन जिंकणारी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या वतीने १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिका संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली. अमेरिकेच्या डावाच्या १८ व्या षटकापर्यंत, हा सामना जिंकून पुन्हा एकदा मोठा अपसेट काढू शकेल असे वाटत होते. पण १९ व्या षटकात आफ्रिकेने कमबॅक करत विजय मिळवला.

George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल
Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज

हेही वाचा – रोहित-विराटचा संदर्भ देत भारताचा कोच होणाऱ्या गंभीरला माजी खेळाडूने दिला इशारा, म्हणाले; “संघातले बरेचसे खेळाडू…”

अमेरिकेच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट काय ठरला?

१९व्या षटकात कागिसो रबाडाने सामना फिरवला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने शानदार फलंदाजी करणाऱ्या हरमीत सिंगची विकेट घेतली. २१ चेंडूत ३८ धावांवर खेळत असलेल्या हरमीतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सीमारेषेवर झेलबाद झाला. हरमीतच्या विकेटनंतर अमेरिकेच्या संघाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली नाही. या षटकात रबाडाने केवळ २ धावा दिल्या. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या पूर्णपणे बाजूने फिरला.

हेही वाचा – “माझा भाऊ थोडा चांगला असता…” वासिम जाफर मायकल वॉनला उद्देशून पाहा काय बोलून गेला? VIDEO व्हायरल

दक्षिण आफ्रिकेने विजयासह रचला इतिहास

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलग पाच सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. गट टप्प्यातील सलग चार सामने जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर-८ मधील पहिला सामना जिंकून सलग पाचव्या विजयाची नोंद केली. क्विंटन डी कॉकला त्याच्या स्फोटक खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिका संघाने ७१ धावांत चार विकेट गमावल्या. यामध्ये स्टीव्हन टेलर (२४), नितीश कुमार (८), कर्णधार आरोन जोन्स (०) आणि कोरी अँडरसन (१२) यांच्या विकेट्सचा समावेश आहे. कर्णधार अॅरोन जोन्स खातेही न उगडता बाद झाला, ज्याचा संघाला मोठ फटका बसला. कारण जोन्स यंदाच्या विश्वचषकात अमेरिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मात्र, यानंतर अँड्रियस गौस (नाबाद ८०) आणि हरमीत सिंग (३८) यांनी सहाव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात कायम ठेवले.

हेही वाचा – T20 WC 2024: “दोन वर्षांपासून नंबर वन फलंदाज…” सुपर ८ सामन्यापूर्वी फलंदाजीवर सुर्यकुमार यादवचे मोठे वक्तव्य

अखेरच्या दोन षटकात अमेरिकेला विजयासाठी २८ धावांची गरज होती. पण १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हरमीत झेलबाद झाला आणि त्यानंतर अमेरिकेचा संघ मागे पडला. त्यानंतर विजयासाठी शेवटच्या षटकात त्यांना २६ धावा करायच्या होत्या, मात्र संपूर्ण २० षटके खेळून संघाला ६ विकेट्सवर केवळ १७६ धावा करता आल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने चार षटकांत १८ धावा देत तीन विकेट घेतले. त्यांच्याशिवाय केशव महाराज, एनरिक नॉर्किया ​​आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सलामीवीर क्विंटन डी कॉकचे (७४ धावा) विस्फोटक अर्धशतक आणि कर्णधार एडन मारक्रमच्या दुसऱ्या विकेटसाठी ६० चेंडूत केलेल्या ११० धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली चार बाद १९४ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारत अमेरिकेला मोठे आव्हान दिले. डी कॉकने संथ आणि फिरकीपटूंसाठी योग्य समजल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर अमेरिकन गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि ४० चेंडूंच्या डावात सात चौकार आणि पाच षटकार मारून स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले. सलामीवीर डिकॉकशिवाय मारक्रमने ४६ धावा केल्या तर हेनरिक क्लासेनने नाबाद ३६ आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद २० धावा केल्या आणि पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची नाबाद भागीदारी केली. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Story img Loader